अहो आश्‍चर्यम्‌, बोकड देतोय दूध!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पाचोरा - माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात केव्हा काय घडेल व काय चमत्कार होईल, हे सांगणे कठीण. अचंबित करणाऱ्या विविध घटना पाहून बऱ्याचदा आपला विश्‍वासही बसत नाही. असाच काहीसा प्रकार आंबेवडगाव (ता. पाचोरा) येथे दिसून येत आहे. शेळीप्रमाणे बोकडही दूध देत असल्याने त्यास पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी होत आहे. 

आंबेवडगाव येथील गोट फार्म चालक करण पवार यांनी बकरी ईदनिमित्ताने बोकड विक्रीसाठी सहा महिन्यांपूर्वी एक बोकड खरेदी केला. त्याची देखभाल करीत असताना त्यास शेळीप्रमाणे दोन स्तन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार एखाद्या आजाराचा तर नाही ना, याची खातरजमा करून घेतली. तेव्हा हा बोकड चक्क दूध देत असल्याचे निदर्शनास आल्याने ते देखील अचंबित झाले. या दुधाच्या चहाची चव शेळीच्या दुधाप्रमाणेच आहे. याबाबत त्यांनी पशुधन पर्यवेक्षक वानखेडे यांना माहिती देऊन विचारणा केली असता, त्यांनी हार्मोन्सच्या फेरबदलामुळे लाखात एखाद्या बोकडाबाबत असा प्रकार घडण्याची शक्‍यता व्यक्त करीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यास सांगितले. 
शेळीप्रमाणे बोकडही दूध देतो, हा प्रकार सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. यामुळे या बोकडाला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. विक्रीच्या उद्देशाने हा बोकड आणला असून, तो दूध देत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याची विक्री करावी की नाही, अशा संभ्रमावस्थेत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

Web Title: milk by male goat