दूध उत्पादनाला पाणी टंचाईची झळ; जिल्ह्यात चार लक्ष लिटर प्रतिदिन घट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

पिण्याच्या पाण्या वाचूनही दुभत्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर आबाळ होऊ लागली आहे. त्याची झळ दूध उत्पादनाला बसू लागले आहे. परिणामी दूध उत्पादनात वीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन प्रतिदिन निम्म्याने घटले आहे.
 

खामखेडा : कसमादे परिसर व जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई रौद्र रूप धारण करू लागली आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांना पुरेशा प्रमाणात हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. शिवाय पिण्याच्या पाण्या वाचूनही दुभत्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर आबाळ होऊ लागली आहे. त्याची झळ दूध उत्पादनाला बसू लागले आहे. परिणामी दूध उत्पादनात वीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन प्रतिदिन निम्म्याने घटले आहे.
 
दुभत्या जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी असावे लागते. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. परंतु सध्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांना थंड पाणी तर सोडा साधे पाणीही पुरेशा प्रमाणात मिळेनासे झाल्याची परिस्थिती मालेगाव, नांदगाव, येवला व चांदवड त्याच बरोबर देवळा तालुक्याच्या पूर्व भागात देखील आहे. 

प्यायलाच पाणी नसल्याने नव्वद टक्के विहिरी फक्त प्यायचेचं पाणी भागवत आहेत. त्यामुळे हिरवा चार दुरापास्त झाला आहे.तर पन्नास टक्क्याहून अधिक भागात हिरव्या चाऱ्याचा अभाव आहे. हिवाळा व पावसाळ्यात मुबलक प्रमाणात हिरवा चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असते त्यामुळे या दोन ऋतूत दूध उत्पादनात वाढ होते. या उलट उन्हाळ्यात मात्र या दोन्ही बाबींचा थेट दूध उत्पादनावर परिणाम होत असतो.
 

नाशिक जिल्ह्यात सरासरी प्रति दिन दहा लाख लिटर दूध उत्पादन होत असते. सद्यस्थितीत त्यात सुमारे चार लाख लिटरने घट झाली असल्याचा अंदाज दुग्ध उद्पाद्क वर्तवत आहेत. त्याचा परिणाम सध्या दूध पावडरला मागणी वाढली आहे.परिणामी पावडरच्या दरातही वाढ झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

देवळा शहरास साढे तीन ते चार हजार लिटर दुधाचे दररोज संकलन होते. मात्र सध्या पाणी व चारा टंचाई यामुळे जवळजवळ सतराशे ते अठराशे लिटर दुधाची टंचाई जाणवू लागली आहे.

''प्रचंड उन्हामुळे वं जनावरांना पैसे देऊनही हिरवा चारा मिळत नसल्याने दुध उत्पादनात घट झाली आहे. देवळा शहरात चार दुध संकलन केंद्र असुन या केंद्रांवर दिवसाला फक्त अडीच हजार लिटर  दुध संकलित होते.''
 - सुभाष चंदन, साईराम दुध संकलन केंद्र देवळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk Production in loss due to Water scarcity