आंबा, खरबुजाची आवक; लाखोंची उलाढाल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नाशिक - अक्षयतृतीयेच्या पूजेसाठी लागणाऱ्या करा आणि केळी (मातीच्या घागरी) खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली. आंबा आणि खरबूज खरेदीसाठीही ग्राहकांची लगबग दिसून आली. 

अक्षयतृतीयेच्या दिवशी लोक पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी करा आणि केळी (मातीच्या घागरी) आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्यामुळे करा आणि केळी घेण्यासाठी रविवार कारंजा येथे गर्दी झाली. 40 ते 60 रुपये जोडी या दराने विक्री झाली. अहमदाबाद येथून करा आणि केळी विक्रीसाठी नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. काही स्थानिक बाजारपेठांतूनही ते विक्रीसाठी आले आहेत. 

खरबुजाचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली. खरबुजाचा भाव 40 ते 50 रुपये किलो असा होता. जळगाव, शिरपूर, सोलापूर, संगमनेर या भागातून खरबूज विक्रीसाठी शहरात दाखल झाले. खरबुजालाही चांगली मागणी आहे. आंब्यांनाही मोठी मागणी आहे. बदाम 60 रुपये, हापूस 120 रुपये, केशर 100 रुपये, देवगड 150 रुपये, राजापुरी 70 रुपये, लागबाग 50 रुपये, लंगडा 120 रुपये किलो दराने आंब्यांची विक्री होत होती. आंबा विक्रीतून आज दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली. 

अक्षयतृतीयेसाठी करा आणि केळी यांच्या पूजनाचे महत्त्व आहे. लालसर मातीतील करा, केळी खास अहमदाबाद येथून आम्ही विक्रीसाठी आणले आहेत. महिलांकडून चांगली मागणी होत आहे. 40 ते 60 रुपये जोडी या दराने विक्री होत आहे. 
- पायल प्रजापती, विक्रेत्या 

ग्राहकांकडून आंब्यांना चांगली मागणी आहे. शहरात गुजरात आणि कोकणातून मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक चांगली आहे. आवक चांगली असल्याने भाव ग्राहकांना परवडेल असेच आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. 
- संजय पानपाटील, विक्रेते 

Web Title: Millions of turnover