धुळ्यात एमआयएमचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

धुळे महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी या निवडणुकीमध्ये एमआयएम या पक्षाने खाते उघडले आहे.

धुळे- धुळे महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असली तरी या निवडणुकीमध्ये एमआयएम या पक्षाने खाते उघडले आहे.

सध्यातरी यामध्ये विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. धुळे महापालिकेत एमआयएमच्या एकूण तीन उमेदवारांचा विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एमआयएमचे सईदा अन्सारी, नाजियाबानो पठाण, सईद बेग हाशम बेग हे विजयी झाले आहेत. तर या प्रभागतील काँग्रेसचे केवळ सुभाष जगताप विजयी झाले आहेत.

दुपारी एकपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार विविध प्रभागाच्या सरासरी 5 ते 6 फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक होती. मात्र, विविध फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र होते. प्रभाग एकमधून भाजपच्या वंदना संजय भामरे, नरेंद्र चौधरी, प्रभाग पाचमध्ये शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील, भाजपचे भगवान गवळी, कृपेश नांद्रे, लोकसंग्राम पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार हेमा अनिल गोटे आदी उमेदवार आघाडीवर होते.

Web Title: MIM in three seats Dhule MNP Election