हमीभाव योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पदरी साडेपाच कोटीचे दान

Crops
Crops

येवला : खाजगी बाजारात मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत शासकीय आधारभूत किंमत हजारापर्यंत जास्त असल्याने तालुक्यातील तब्बल हजारांवर शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, तूर, मुगाला रास्त भाव मिळाला आहे. यातून शेतकऱ्यांच्या पदरी सुमारे साडेपाच कोटींचे दान पडले आहे. विशेष म्हणजे प्रथमच इतकी मोठी उलाढाल झाल्याने खरेदी केंद्र असलेल्या तालुका खरेदी विक्री संघाची कडकी दूर होऊन संघ उर्जितावस्थेत आला आहे.

खरेदी विक्री संघाचा मुख्य व्यवसाय रासायनिक खते विक्रीचा आहे.जिल्ह्यात इफको कंपनीची विकमी खत विक्री संघाने या वर्षी केली असुन मुख्य म्हणजे आधारभूत खरेदीतुन संघाला फायदा झालाच पण शेतकऱ्यांना देखील मोठा लाभ मिळून देण्यात संघाला यश आले आहे. संस्थेचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी मुंबई मार्केटिंग फेडरेशच्या सर्वसाधारण सभेत तालूक्यात मुग, उडिद ,सोयाबिन, हरबरा खरेदी केंद्र आग्रहापूर्वक या वर्षापासुन मंजूर करून तात्काळ सुरू केले. मका साठवणूकीसाठी गोदामांची प्रचंड अडचण असतांनाही राज्य कापूस पणन महासंघाच्या अध्यक्षा उषाताई शिंदे व जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांच्या सहकार्याने व तहसिलदार नरेशकुमार बहिराम यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ह्या वर्षी मकाची विक्रमी खरेदी झाली.

तूर खरेदीही यापूर्वीचे खरेदीचे सर्व विक्रम पार करणार आहे. या वर्षापासुन सर्व शासकिय शेतमाल खरेदी योजनेत ऑनलाईन नोंदणी, खरेदी, पेमेंटचे बदल येउनही नियोजनबद्ध पारदर्शी कामकाजामुळे ५ कोटी ५० लाखाच्या आसपास मार्च अखेर आधारभूत किंमत योजने अंर्तगत शेतमाल खरेदी झाला असुन ही विक्रमी खरेदी आहे.यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दराने शेतमाल विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली नाही.

उशीर व सहकाऱ्यांचे नियोजनबद्ध कामकाज
प्रमुख राजकिय नेत्यांच्या सहमतीचे राजकारणाचे प्रतिक असलेला संघ तब्बल १७ वर्षानंतर पुन्हा एकदा आर्थिक दृष्टया सक्षमपणे उभा राहतांना दिसतोय. जादूची कांडी फिरावी अन मरगळ झटकावी. याप्रमाणे संघाच्या कामकाजात अमुलाग्र बदल होउन संस्थेची पून्हा गतवैभवातील नावारूपाकडे वाटचाल सुरू झाली आहे. संघाचे विद्यमान अध्यक्ष भागुनाथ उशीर, उपाध्यक्ष नाना शेळ्के, व्यवस्थापक बाबा जाधव व सर्व संचालक मंडळ यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षी खतविक्री व्यवसाय, मार्केटिंग फेडरेशन कमिशन, जागाभाडे आदि मधुन जवळपास २० लाख रुपयाचा नफा संस्थेस मिळणार असुन यातून कामकाज चालणार आहे.

मका खरेदी व्हावी सुरू
ऑनलाईन मका नोंदणी करुणही अद्याप हजारांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी झालेली नाही.शासनाने खरेदी बंद केल्याने हे शेतकरी वंचित राहिले आहेत.
सरकारने नोंदणी केलेल्या मकाची खरेदी करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी अपेक्षा अजूनही व्यक्त होत आहे.

अशी झाली खरेदी व उलाढाल
* मक्याची विक्रमी २५१७३ क्विं. खरेदी,भाव १ हजार ४२५ रुपये मिळला.४३३ शेतकऱ्यांना ३ कोटी ५८ लाख ७२ हजार रू. मिळाले.
* तूरीची १९५६ क्विं. खरेदी, भाव ५ हजार ४५० रुपये मिळाला.२३२ शेतकऱ्यांना  १ कोटी ६ लाख ६० हजार रू. मिळाले.
* मुगाची ६३९ क्विंटल खरेदी होऊन भाव ५ हजार ५७५ मिळाला.१५७ शेतकऱ्यांना        ३५ लाख ६२ हजार ४२५ रुपये मिळाले.
* उडिदाची १६१ क्वि. खरेदी, भाव ५ हजार ४५० रुपये मिळाला तर ४४ शेतकऱ्यांना ८ लाख ७७ हजार रू. मिळाले.
*सोयाबिनची १०१२ क्विं.खरेदी, भाव ३०५०  रुपये तर ८५ शेतकऱ्यांना मिळाले ३० लाख ८८ हजार
■ एकुण किंमत = ५ कोटी ४० लाख ६० हजार ४३७ रुपये

"संघाच्या माध्यमातुन बी-बियाणे रासायनिक औषधांचे दूकान, आवारात महासेतू केंद्र उभारणी, कार्यालय इमारतीचे नुतनीकरण करून संस्थेचे उत्पन्न अधिक वाढवण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. संघाच्या अध्यक्षपदी निवड होताना माझ्याकडून संस्थेचे हित जोपासले जाईल ही जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे व तालूक्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय" असे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com