बांधकाममंत्र्याच्या 'गार्ड'कडून टोल कर्मचाऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

या मारहाणीत टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिकमधील वक्रतुंड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून, पोलिस तपास करत आहेत.

नाशिका - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा रक्षकाने घोटी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. टोलवरून गाडी सोडण्यास उशीर झाल्याने हे कृत्य करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानिमित्त नाशिकमध्ये आलेले मंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे परतत असताना मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. घोटी टोलनाक्यावर त्यांच्या सुरक्षारक्षकाकडून टोलवरून गाडी सोडण्यास उशीर केल्याच्या रागातून संदीप घोंगडे या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली. तसेच या सुरक्षारक्षकाकडून टोल नाक्यावरील काचाही फोडण्यात आल्या आहेत.

या मारहाणीत टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिकमधील वक्रतुंड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून, पोलिस तपास करत आहेत.

Web Title: minister eknath shinde's bodyguard beaten toll booth worker in nashik