मंत्री गिरीश महाजन यांचा चक्क एसटीतून प्रवास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

राज्य परिवहन महामंडळचा 71 वा वर्धापन दिन जळगाव विभगकडून साजरा करण्यात आला. एसटीचा वर्धापन दिन असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी 8 वाजता आपल्या शासकीय वाहनाऐवजी बसने जळगाव ते जामनेर असा प्रवास केला. बस प्रवास करण्यापूर्वी महाजन यांनी जळगाव बस आगारात पाहणी केली.

जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (ता. 1) एसटीतून प्रवास केला. तसेच बसमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत देखील केले.

राज्य परिवहन महामंडळचा 71 वा वर्धापन दिन जळगाव विभगकडून साजरा करण्यात आला. एसटीचा वर्धापन दिन असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी 8 वाजता आपल्या शासकीय वाहनाऐवजी बसने जळगाव ते जामनेर असा प्रवास केला. बस प्रवास करण्यापूर्वी महाजन यांनी जळगाव बस आगारात पाहणी केली. यावेळी जळगाव आगाराच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. जळगाव बस आगारात एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते जळगाव-जामनेर बसने जामनेरला जाण्यासाठी निघाले. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी महाजन यांनी बसचे चालक व वाहकाचा सत्कार केला. 

मंत्री आपल्यासोबत बसने प्रवास करणार असल्याचे पाहून बसमधील इतर प्रवाशांना सुखद धक्का बसला. जामनेरला जाण्यासाठी बसने निघालेल्या गिरीश महाजन यांच्यासोबत असलेल्या 9 सहकाऱ्यांनी बसच्या महिला वाहकाकडून तिकीट देखील काढून घेतले. यावेळी महिला वाहकाला गिरीश महाजन यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Girish Mahajan travel on ST bus in Jalgaon