शिंदखेड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी पर्यटन मंत्र्यांची 'बुराई परिक्रमा' सुरू 

Jaikumar Raval
Jaikumar Raval

धुळे : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाला दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी रणरणत्या उन्हात एकूण 50 किलोमीटर पायपीट करत बुराई परिक्रमेला सुरवात केली आहे. त्यांनी बुधवारी पहिल्या दिवशी 12 किलोमीटर पायपीट करत परिक्रमेला सुरवात केली. पंधरा एप्रिलपर्यंत त्यांची परिक्रमा सुरू राहील. 

दुसाने (ता. साक्री) येथून बुधवारी सकाळी बुराई परिक्रमेला सुरवात केली. बुराई नदी बारमाहीचा संकल्प करत मंत्री रावल यांनी वीस कोटी पंधरा लाखांच्या निधीतून 34 बंधारे बांधणे, यापैकी 24 बंधाऱ्यांचे भूमीपूजन येत्या चार दिवसात करून सर्व कामे तीन महिन्यात पूर्ण केली जातील, अशी ग्वाही दिली. मंत्री रावल यांच्या हस्ते बुराई नदीवर बांधण्यात येणाऱ्या दोन बंधाऱ्यांच्या कामाचे भूमीपूजन झाले. 

पाच दिवस परिक्रमा 
मंत्री रावल म्हणाले, की अवर्षणप्रवण भागाच्या विकासासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग बुराई नदी बारमाही करण्याचा प्रयत्न आहे. हे स्वप्न साकारण्याचे ठाणले आहे. या प्रयत्नातून आगामी काळात बुराई नदी परिसरातील विहिरींची पातळी उंचावण्यास मदत होईल. अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. क्षेत्रातील सुमारे सहा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकेल. माथा ते पायथा या पद्‌धतीने बंधारे बांधण्यात येतील. ते दर्जात्मक व गुणवत्तापूर्ण बांधण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. परिक्रमेवेळी ठिकठिकाणचे शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधता येईल. पाच दिवसीय बुराई परिक्रमेत 50 ते 52 किलोमीटर पायपीट केली जाईल. 

योजनांचा प्रसार, प्रचार 
बुराई नदी परिसरात सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यावरणावरही लक्ष केंद्रित करावे. लोकसहभागातून विकास होऊ शकतो, असे आदर्श बारीपाड्याचे प्रवर्तक चैत्राम पवार म्हणाले. दुसाने येथून निघालेल्या दिंडीवेळी महसूल, सिंचन, कृषी, आरोग्य, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या विविध अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड, सातबारा वाटप, उज्ज्वला गॅस जोडणी योजना, आरोग्य विषयक जनजागृती केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com