तो आला... त्यानं पाहिलं... आणि त्यानं चोरलं! (व्हिडिओ)

Thief-Shirpur
Thief-Shirpur

शिरपूर : तो आला... त्यानं उभं राहून इकडे-तिकडे पाहिलं... आणि पाहता पाहता पैशांनी भरलेली बॅग घेऊन तो फरार झाला. शिरपूर (जि.धुळे) येथील अल्पवयीन चोरट्याचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

शिरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि कायम गजबजलेले ठिकाण असलेल्या महाराजा कॉम्प्लेक्स येथील शिरपूर पीपल्स बँकेबाहेर 14 नोव्हेंबरला दुपारी चोरीची घटना घडली. दुचाकीला अडकवलेली पैशांची थैली एका चोरट्याने दिवसाढवळ्या आणि ऐन गर्दीच्या ठिकाणाहून लंपास केली.

लक्ष्मण दामोदर पाटील (रा. क्रांती नगर, वनावल, शिरपूर) यांनी 14 नोव्हेंबरला त्यांनी पीपल्स बँकेतून पैसे काढले. ते पैसे एका थैलीत ठेऊन ती दुचाकीच्या मागील बाजूला अडकवली. बँकेजवळून वळण घेताना संशयित अल्पवयीन चोरट्याने ती थैली काढून पोबारा केला. त्यामध्ये सुमारे 30 हजार रुपये आणि काही कागदपत्रे होती.

चोरी लक्षात आल्यावर लक्ष्मण पाटील यांनी परिसरात शोध घेतला. चोरीस गेलेली थैली आणि कागदपत्रे शिरपूर बायपास रस्त्यावरील देशी दारू विक्रीच्या दुकानामागे फेकलेली आढळली. मात्र, त्यातील रक्कम चोरट्याने काढून घेतली होती. 

बँकेबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये चोरटा काही सेकंदापूर्वी येऊन उभा राहिल्याचे स्पष्ट दिसून येते. त्याने बॅग अडकवताना पाटील यांना हेरले. जलद हालचाल केली आणि बॅग घेऊन निसटला. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com