Dhule : अल्पवयीन मुलाने लांबवली बँकेतून 70 हजारांची बॅग

dhule crime news
dhule crime newsesakal

धुळे : अल्पवयीन मुलाने (Minor) बँकेतून भरदुपारी ग्राहकाची ७० हजार रोकड असलेली बॅग लांबविल्याची (Stolen) घटना गुरुवारी (ता. ३०) दुपारी तीनच्या सुमारास दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथे घडली. बॅग लंपास करणारा मुलगा बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (minor boy stole bag of Rs 70000 from maharashtra bank Dhule Crime news)

dhule crime news
हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार

दिनेश संजीव पाटील (रा. पाटील गल्ली, दोंडाईचा) गुरुवारी दुपारी तीनला त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राच्या पैसे भरण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र दोंडाईचा शाखेत गेले. बँकेत एका टेबलवर पैशांची बॅग ठेवली. त्यांची पत्नी रेखा हिच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी काउंटरपासून काही अंतरावर जात फोन लावण्यासाठी नंबर शोधत होते. मात्र, नेटवर्क नसल्याने फोन न लावता जिथे बॅग ठेवली तिथे गेले. त्यांना बॅग तिथे आढळली नाही. बँकेचे व्यवस्थापक गौरव बॅनर्जी यांना बॅगेबाबत विचारणा केली असता, त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. बॅनर्जी यांना सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची विनंती केली. त्यात १२ ते १५ वर्षीय मुलगा बॅग उचलून जाताना कैद झाल्याचे दिसले. बॅगेत ७० हजारांची रोकड, धनादेश पुस्तिका, पासबुक असल्याचे दोंडाईचा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

dhule crime news
Jalgaon : यावल अभयारण्यातील अतिक्रमण काढले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com