लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पीडितेने दिला अपत्याला जन्म 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नाशिक : वडाळा-पाथर्डी रोड परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने वेळोवेळी बलात्कार केला. त्यामुळे गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन पीडितेने अपत्याला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीसात फिर्याद दिली असून, गुन्हा नाशिकमध्ये घडल्याने याप्रकररी इंदिरानगर पोलीसात सदरचा वर्ग झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही इंदिरानगर परिसरातील वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील एका महाविद्यालयाच्या पाठीमागे राहते. येथे राहत असताना मार्च ते ऑक्‍टोबर 2017 यादरम्यान, तिच्यावर राहत्या घरी संशयित सुनील रणपिसे (रा. साठेनगर, नाशिक) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यातून सदरची पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका अपत्यालाही जन्म दिला आहे.

याचप्रकरणी पीडित मुलीने गेल्या 6 मार्च रोजी औरंगाबाद येथील पुंडलिकनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. मात्र सदरचा गुन्हा नाशिकमध्ये घडलेला असल्याने तो इंदिरानगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार इंदिरानगर पोलिसात संशयिताविरोधात पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप संशयिताला अटक करण्यात आलेली नाही. संशयिताची नावाव्यतिरिक्त कोणतीही माहिती पोलिसांकडे नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडसर येत असून पीडितेच्या जवाबानंतर संशयिताची माहिती मिळू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. सदरील गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बेल्हेकर या करीत आहेत.

Web Title: minor get raped, The victim gave birth to a newborn