अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला 5 वर्षे सक्तमजुरी

Minor girl child abuse one gets 5 years of imprisonment
Minor girl child abuse one gets 5 years of imprisonment

नाशिक : पाच वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या नराधमास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी 5 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना एक एप्रिल रोजी घडली. त्यानंतर आता यातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

विद्यासागर उर्फ समाधान प्रकाश पाटील (33, रा. पाटीलनगर, सिडको, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. 1 एप्रिल 2018 रोजी पीडित 5 अल्पवयीन मुलगी भाऊ व मैत्रिणीसोबत खेळत होती. त्यावेळी आरोपी समाधान याने खाऊसाठी पैसे देतो, असे आमिष दाखवून तिला तो राहत असलेल्या वरच्या खोलीत नेले. त्याठिकाणी त्याने पीडितेचा विनयभंग केला. त्यावेळी तिचा भाऊ आणि मैत्रीण तिला शोधत आले असता त्यांनी सदरची बाब पाहिली. त्यानंतर पीडितेने ही बाब घरी आईला सांगितली. याप्रकरणी अंबड पोलिसात विनयभंग व पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

सदरील गुन्ह्याचे 31 मे रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षतर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी 8 साक्षीदार तपासले. यात अल्पवयीन पीडित मुलीसह तिचा लहान भाऊ आणि मैत्रिणीची साक्ष महत्वाची ठरली.

तसेच न्या. शिंदे यांनीही चिमुकळ्यांनी धाडसाने न्यायालयात साक्ष दिल्याचे कौतुक केले. आरोपीस 5 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 7 महिन्यात खटल्याचा निकाल लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com