Dhule Crime : अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, चिंग्या नामक तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल | minor girl given childbirth due to torture crime registered Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A minor girl Pregnant from abuse

Dhule Crime : अत्याचारातून अल्पवयीन मुलीची प्रसूती, चिंग्या नामक तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

Dhule News : शहरातील चक्करबर्डी येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा रूग्णालयात अत्याचारातून मालेगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला.

ही माहिती येथील शहर पोलिस ठाण्याला समजल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले.

मात्र, त्यांनी टाळाटाळ केल्याने गुरुवारी (ता. १८) धुळे शहर पोलिसांनी संशयित चिंग्या याच्याविरूध्द लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. तो मालेगाव तालुका पोलिसांकडे वर्ग केला आहे. (minor girl given childbirth due to torture crime registered Dhule News)

धानेगाव (ता. मालेगाव) येथील १७ वर्षीय मुलीचे पोट ८ मेस सायंकाळी दुखू लागले. त्यामुळे तिला नातेवाईकांनी येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले.

तपासणीदरम्यान ती गरोदर आणि नऊ महिन्यांचे बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नऊ मेस पीडित मुलगी प्रसूत झाली.

बाळ आयसीयूत आहे. मुलीची प्रकृती मध्यम आहे. याबाबत डॉक्टरांनी धुळे शहर पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. नंतर येथील शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने मुलीच्या आईची चौकशी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळी आठला कामावर जाताना मुलीला घरी एकटी सोडून जात असल्याचे आईने सांगितले. दोन ते तीन महिन्यांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने आर्वी (ता. धुळे) येथे तपासणी केली असता डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले.

याबाबत तिला विचारले असता तिने गावातील चिंग्या नामक तरुणाशी प्रेम व शरीरसंबंध असल्याचे सांगितले. भीतीपोटी मुलास काहीही विचारणा केली नसल्याचे पीडित मुलीच्या आईने चौकशीत सांगितले.

याबाबत शहर पोलिसांनी मालेगाव तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, तेथील पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याने धुळे शहर पोलिसांनी पीडितेच्या आईच्या जबाबावरून धानेगाव येथील चिंग्या नामक तरुणावर विविध कलमान्वये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.