अल्पवयीन मुलीला पळवून पुण्यात थाटला संसार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या संशयित अजय विजय भालेराव (वय २२, रा. गेंदालाल मिल) याला शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. मुलीसोबत मंदिरात लग्न करून दोघेही हिंजवडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली होती.

जळगाव - अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या संशयित अजय विजय भालेराव (वय २२, रा. गेंदालाल मिल) याला शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. मुलीसोबत मंदिरात लग्न करून दोघेही हिंजवडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. 

शहरातील गेंदालाल मिल परिसरातील सोळा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार डॉ. रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांनी मुलीच्या शोधार्थ पोलिस उपनिरीक्षक मीना तडवी, संजय बडगुजर, गणेश शिरसाळे, दीपाली पोरे यांचे पथक नियुक्त केले. पथकाला चौकशीअंती अल्पवयीन मुलीला गेंदालाल मिलमधील अजय विजय भालेराव याने पळविले असल्याची माहिती समोर आली होती. दोघेही पुण्याला असल्याची खात्री झाल्यावर पथक रविवारी पुणे रवाना झाले होते. हिंजवडी परिसरातून मुलीसह संशयित अजयला ताब्यात घेत मंगळवारी सकाळी जळगावात आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor Girl Marriage Family Life Crime