
पानेवाडी येथील शेतकरी भीमा सांगळे (वय 65) मंगळवारी त्यांचा तीनवर्षीय नातू वैभव सुनील सांगळे याला घेऊन मळ्यात गेले होते. मात्र, ते घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. त्यांच्याकडे मोटारसायकल असल्याने ते नातेवाइकांकडे गेल्याचा अंदाज होता. मात्र, तपास करूनही त्यांच्याबद्दल कोणाला माहिती नव्हती. मंगळवारी रात्रीही घरी न आल्याने बुधवारी त्यांचे कुटुंब व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. गावाजवळील विहिरीत पाण्यावर तेलाचे तवंग दिसत होता.
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून मंगळवार (ता. 3) पासून हरविलेल्या आजोबांचा बुधवारी (ता. 4) गावाजवळील विहिरीत मृतदेह आढळून आला. बेपत्ता नातवाचा तपास रात्री उशिरापर्यंत लागलेला नव्हता. विहिरीत मोटारसायकल सापडल्याने हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बेपत्ता झालेल्या आजोबांचा तर......
पानेवाडी येथील शेतकरी भीमा सांगळे (वय 65) मंगळवारी त्यांचा तीनवर्षीय नातू वैभव सुनील सांगळे याला घेऊन मळ्यात गेले होते. मात्र, ते घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. त्यांच्याकडे मोटारसायकल असल्याने ते नातेवाइकांकडे गेल्याचा अंदाज होता. मात्र, तपास करूनही त्यांच्याबद्दल कोणाला माहिती नव्हती. मंगळवारी रात्रीही घरी न आल्याने बुधवारी त्यांचे कुटुंब व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. गावाजवळील विहिरीत पाण्यावर तेलाचे तवंग दिसत असल्याने विहिरीत शोध घेतला असता, भीमा सांगळे यांचा मृतदेह विहिरीत सापडला. तसेच मोटारसायकलही विहिरीत आढळून आली. मात्र, नातू वैभव याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता. शोधकार्य सुरू होते. मोटारसायकलवरून घरी येत असताना कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने भीमा सांगळे थेट विहिरीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.
भीमा सांगळे (मृत)
वैभव (पानेवाडी) बेपत्ता
हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय......
तीनवर्षीय नातवाचा शोध सुरू; पानेवाडी येथील घटना
दरम्यान, शेतकरी कुटुंबातील आजोबांचा मृत्यू झाल्याने व नातवाचा तपास न लागल्याने पानेवाडी गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
वाचा सविस्तर > प्रसुतींच्या कळांनी बिथरली होती 'ती'...त्यातच तिला दिसला 'तो'