शिक्षकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: किशोर दराडे

Yeola
Yeola

येवला : पाचही जिल्ह्यातील शिक्षक बांधवानी माझ्यावर विश्वास टाकत मला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रलंबित व नव्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नाच्या विरोधात त्यांचा आवाज बनून मी सहा वर्षे काम करेल असे आश्वासन नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य,आमदार किशोर दराडे यांनी केले.

शुक्रवारी पहाटे सहा वाजता मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर शहरात आलेल्या दराडे यांचे सायंकाळी जोरदार मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुपारी निवास्थानी आगमन झाल्यावर दिवसभर समर्थकांनी येऊन अभिनंदन व सत्कार केला. सायंकाळी पाच वाजता दराडे यांचे येथील विंचूर चौफुलीवर आगमन होताच जयजयकाराच्या घोषणा देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिवसेना नेते संभाजी पवार,तालुका प्रमुख रतन बोरणारे,वाल्मिक गोरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी माजी नगराध्यक्ष पकज पारख,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,उपनगराध्यक्ष सुरज पटणी,नगरसेवक अजय जैन,कांतिलाल साळवे, नगरसेविका सरोजिनी वखारे आदींसह पदाधिकारी व समर्थकांची उपस्थिती होती.

यानंतर शहरातून उघड्या वाहनातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सजवलेल्या वाहनावर भगवा फेटा परिधान करून आमदार नरेन्द्र दराडे,श्री.दराडे यांच्यासह शिवसेनेचे नेते संभाजी पवार,माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,गोल्डमन पंकज पारख,अजय जैन मिरवणुकी दरम्यान उभे होते.मिरवणुकीत समर्थक व कार्यकर्ते जय भवानी जय शिवाजी,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन हातात झेंडे घेऊन नाचत होते.फटाक्यांची जोरदार आतषबाजी,डीजेचा जोरदार आवाज आणि हलकडीचा निनादात संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेणारी ही मिरवणूक ठरली.

ही मिरवणूक कापड बाजारातून सराफ पेठेतून दराडे यांनी पहिलवानकी केलेल्या धोंडीराम वस्ताद तालमीवरून काळा मारुतीमार्गे जाऊन टिळक मैदानावर मिरवणुकीचा जल्लोषात समारोप करण्यात आला.दराडे कुटुंबातील महिला भगवा फेटा बांधून या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.मिरवणूक मार्गावर घरोघरी किशोर दराडे,कुणाल दराडे यांनी ठिकठिकाणी खाली उतरत नागरिकांची शाल तसेच फेटा बांधून केलेल्या सत्काराचा स्वीकार केला.शहरकाजी राफिउद्दिन काझी यांनीही दराडे बंधूंचा सत्कार केला.मिरवनूकीत मर्चंट बँकेचे संचालक अरुण काळे,मनीष काबरा,सुधीर गुजराथी,नगरसेवक गणेश शिंदे,गटनेते झामभाऊ जावळे,राजेंद्र लोणारी, बाजार समितीचे माजी सभापती सुधीर जाधव,साईनाथ गिडगे,प्रमोद पाटील,नितीन काबरा,नगरसेवक दयानंद जावळे,गणेश शिंदे,पोपट आव्हाड,दत्तात्रय वैद्य,प्रमोद बोडके,राहुल गुजराथी,सुहास भांबारे,राहुल लोणारी,शिक्षक नेते मोहन चकोर,काटे,दिगंबर नारायणे आदि मोठ्या संख्येने सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com