बैलगाडीत बसले आमदार दराडे तर महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर थापल्या भाकरी  

MLA Narendra Darade organized a protest against the diesel petrol price hike in yevla
MLA Narendra Darade organized a protest against the diesel petrol price hike in yevla

येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले. 

डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच पाहिजे, सक्तीची वीज बील वसुली थांबलीच पाहीजे, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत शिवसेनेचा भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी शेकडो शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, आमदार नरेद्र दराडे,सहसंपर्कप्रमुख संभाजीराजे पवार, जिल्हा समन्यवय कुनाल दराडे, उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेद्र लोणारी, उपसभापती रूपचंद्र भागवत आदीनी मोर्चाचे नेतृत्व केले. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचताना अनेक युवकांनी बंद मोटारसायकली लोटीत आणल्या. तर शिवसेना महिला आघाडीच्या साधना घोरपडे, नगरसेविका सरोजनी वखारे,सभापती नम्रता जगताप सुमित्रा बोठे आदीनी प्रतिकात्मक चुल पेटवुन भाकरी थापली व शासनाच्या धोरणांचा निषेध केला.

शिवसेनेचे आमदार नरेद्रजी दराडे यांनी बैलगाडी हाकुन सर्वाचे लक्ष वेधून घेतले. इंधन दरवाढीचा भस्मासूर म्हणून बैल गाडीवरती मोटारसायकल ठेवून तरूणांनी लक्षवेधी दुष्य दाखवले.बैलगाडीचे सारथ्य दराडे यानी करून पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. याप्रसंगी आपल्या भाषनात विधानसभा संपर्क प्रमुख कोकीळ यांनी शासनाच्या नाकर्तेपणाचा समाचार घेतला.महाराष्ट्रात गृहीणी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी शेतमजुर कुणीही सुखी नसुन भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचा हा परीणाम असुन, येणाऱ्या काळात शिवसेने शिवाय पर्याय नाही. शेतकरी हाल अपेष्ठा सहन करीत असून सरकार त्यांना लुटीत आहे, शेतकऱ्याची व सर्वसामन्याची सहनशिलता संपली असुन, शिवसेनेचाच महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आमदार दराडे यांनी या संदर्भात विधीमंडळात लक्षवेधी सुचना माडली असुन, सर्वसामान्य व शेतकर्याच्या प्रश्नाला मी विधीमंडळात वाचा फोडणार असल्याचे सांगुन त्यांनी शासनाच्या धोरणावरती सडकुन टिका केली.सहसंपर्कप्रमुख संभाजीराजे पवार यांनी देखील शासनाला सर्वसामान्याशी देणेघेणे नसल्याचे सागुन सक्तीची वीजबिल वसुली, दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष, शेतीमालाला भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

यावेळी कुनाल दराडे, विधानसभा संघटक रूपचंद्र भागवत, सुमित्रा बोठे,तालुकाप्रमुख बोरणारे आदीनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राहुल लोणारी, धिरज परदेशी, पंचायत समिती सदस्य मगेश भगत, प्रविण गायकवाड, छगन आहेर, पुडंलिक पाचपुते, कैलास घोरपडे, दीपक भदाणे,महेश सरोदे, प्रजव्ल पटेल, लक्ष्मण गवळी, प्रमोद तक्ते, शाम गुंड, राउसाहेब नागरे, गणेश पेढारी, विठ्ठल महाले, दत्तु देवरे, भागिनाथ थोरात, संजय सालमुठे, आनदा आहेर, अशोक आव्हाड, बापुसाहेब गायकवाड, मनोज रंधे, बापु दाभाडे, दत्ता काळे आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com