"नॉट रिचेबल'मधील "या" आमदारांची नाट्यमयरीत्या सुटका..टोपीविना शर्ट इन करत निघाले मुंबईकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

नवी दिल्लीच्या विमानतळावर कुणीही ओळखू नये म्हणून झिरवाळांनी आपली पारंपरिक वेशभूषा आणि टोपी उतरवून शर्ट इन केला होता. सायंकाळी सव्वासहाला विमानाने निघालेले झिरवाळ रात्री आठला मुंबईत पोचले. कार्यकर्त्यांनी हॉटेलमधून बाहेर पडल्यावर झिरवाळांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील 6, जनपथ निवासस्थानी नेले. तेथे वाहिन्यांशी संवाद साधताना झिरवाळ आपल्या पायजमा-सदरा आणि टोपी या वेशभूषेत बघावयास मिळाले होते. 

नाशिक : राष्ट्रवादीच्या "नॉट रिचेबल'मधील दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ यांची नाट्यमयरीत्या सुटका झाली. पक्षाच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांनी शोध घेऊन त्यांना सोबत घेतले. गुरगावच्या आलिशान हॉटेलमधून टी-शर्ट घालून झिरवाळ बाहेर पडले.

विमानतळावर कुणीही ओळखू नये म्हणून....

एवढेच नव्हे, तर मंगळवारी (ता. 25) सायंकाळी नवी दिल्लीच्या विमानतळावर कुणीही ओळखू नये म्हणून झिरवाळांनी आपली पारंपरिक वेशभूषा आणि टोपी उतरवून शर्ट इन केला होता. सायंकाळी सव्वासहाला विमानाने निघालेले झिरवाळ रात्री आठला मुंबईत पोचले. कार्यकर्त्यांनी हॉटेलमधून बाहेर पडल्यावर झिरवाळांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील 6, जनपथ निवासस्थानी नेले. तेथे वाहिन्यांशी संवाद साधताना झिरवाळ आपल्या पायजमा-सदरा आणि टोपी या वेशभूषेत बघावयास मिळाले होते. 

Image may contain: 1 person, closeup

विमानातून टोपीविना शर्ट इन करत निघाले मुंबईकडे 

आदिवासी माणूस शब्दाला पक्का असतो, असे सांगत झिरवाळांनी, निधन झाल्यावर हाडांमधून "शरद पवार' असे शब्द निघतील, असे स्पष्ट करत पक्षाध्यक्षांबद्दलची निष्ठा मांडली. ते म्हणाले, की "अजितदादा पाच मिनिटे भेटणार आहेत, तुम्ही धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी या,' असा निरोप मिळाला होता. तेथून राजभवनात नेल्यावर भाजपची नेतेमंडळी दिसली आणि मनात पाल चुकचुकली. शपथविधी झाल्यावर अजितदादांच्या बंधूंच्या निवासस्थानी नेण्यात आले. जेवण झाल्यावर गाड्यांमधून नेण्यात आले. गुरगावमध्ये पोलिसांच्या टोळ्या तैनात करण्यात आल्या होत्या. 

गुरगावच्या आलिशान हॉटेलमधून टी-शर्ट घालत झिरवाळ पडले बाहेर  

गुरगावच्या हॉटेलमधून बाहेर पडून शरद पवार यांच्याकडे कसे जाऊ शकतो, याचा विचार करत होतो. जनतेमध्ये साहेबांच्या विरोधात पळून गेल्याचा संभ्रम तयार झाला होता. मात्र, शून्यातून इथपर्यंत साहेबांमुळे पोचल्याची भावना कायम आहे. पक्षाध्यक्षांसमवेत कायम राहणार आहे. -नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादीचे आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Narhari Zirwal going delhi to mumbai by plain Nashik Marathi News