नाशिक : आमदार नरहरी झिरवाळ यांचा जिल्हा परीषेदेत रात्रभर ठिय्या

दिगंबर पाटोळे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

दिंडोरी तालुक्यातील चौसाळे व सावरपातळी गावाजवळ सिमेंट क्रॉंक्रीट बंधारे बांधण्याबाबतच्या निविदा प्रकरणात लघु पाटबंधारे विभाग (पश्चिम) चे कार्यकारी अभियंता यांनी अनियमीतता केल्याची तक्रार दिंडोरी- पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केली केली असून, सदर प्रकरणाची चौकशीच्या मागणीसाठी आमदार मंगळवारी सकाळी साडे अकरापासून जिल्हा परीषदेच्या आवारात ठिय्या मांडून बसलेले आहेत.

वणी (नाशिक)  :  दिंडोरी तालुक्यातील चौसाळे व सावरपातळी गावाजवळ सिमेंट क्रॉंक्रीट बंधारे बांधण्याबाबतच्या निविदा प्रकरणात लघु पाटबंधारे विभाग (पश्चिम) चे कार्यकारी अभियंता यांनी अनियमीतता केल्याची तक्रार दिंडोरी- पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केली केली असून, सदर प्रकरणाची चौकशीच्या मागणीसाठी आमदार मंगळवारी सकाळी साडे अकरापासून जिल्हा परीषदेच्या आवारात ठिय्या मांडून बसलेले आहेत.

जिल्हा परिषद नाशिक लघुपाटबंधारे पश्चिम विभाग यांच्याकडील दिंडोरी तालुक्यातील चौसाळे व सावरपातळी गावाजवळ सिमेंट कॉंक्रीट बंधारे बांधणे बाबतच्या फाईल, निविदा प्रक्रियेत कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे पश्चिम यांनी त्यांच्या अधिकारात अनियमितता केल्याने व तसेच त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदरच्या नस्ती वित्त विभागातून गहाळ झाल्याचे बतावणी करीत आहे. सोमवार आमदार झिरवाळ हे स्वत: जिल्हा परीषदेत याबाबत चौकशी करीत असून मंगळवारी ता. १७ राेजी सकाळी साडे अकरा वाजेपासून रात्रभर जागून आज बुधवारी सकाळ पर्यंत आमदार झिरवाळ  जिल्हा परिषद नाशिक येथे सदर प्रकरणाचा खुलासा व कारवाई व्हावी यासाठी ठिय्या मांडलेला आहे.

दरम्यान, परंतु संबंधित यंत्रणेकडून कुठल्या प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार आमदार झिरवाळ यांनी विभीगीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे पत्रान्वये रात्री उशिरा केली असून त्यात सदर प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई करावे ही विनंती विभागीय आयुक्तांना करीत कारवाई होत नाही तोपर्यंत मी जिल्हा परिषद नाशिक येथून जाणार नसल्याची भुमिका घेतल्याने जिल्हा परीषदेत खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री उशिरा जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी यांनी आमदार झिरवाळ यांची भेट घेतली आहे. मात्र आमदार आपल्या भुमिकेवर ठाम असून आमदार समर्थकांनी जिल्हा परीषदेकडे धाव घेण्यास सुरुवात केली अाहे.

आमदारांची जिल्हा परीषदेत जनतेच्या कामासंदर्भात दखल घेतली जात नसून त्यांनाच अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीचे उत्तरे मिळत असेल व रात्रभर जागून ठिय्या आंदोलन करावे लागत असेल तर, सर्वसामान्य जनतेला आपल्या कामासांठ किती हेलपाटे व त्रास सहन करावा लागत असेल असा प्रश्न नागरिक व्यक्त करीत असून चिरीमिरी शिवाय जिल्हा परीषदेतील कागद हालत नसल्याचा आरोप कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करीत अाहे. आज  मुख्यमंत्री महाजनादेश रॅली साठी नाशिक दौऱ्यावर येत असतांना दुसरीकडे आमदार झिरवाळ यांच्या ठिय्या आंदोलनाने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी असून याबाबत प्रशासकीय यंत्रेणेकडून काय कार्यवाही होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Narhari Zirwal on strike in zp