काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेक्कार: राज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

सरकार जेवढे संगणकावर लक्ष ठेवेल, तेवढे त्यांना कळेल मोदींना शिव्या पडत आहेत. किती लोकांच्या घरात घुसणार आहात. नोटबंदीनंतर मी म्हणालो होतो, मोदींनी राजकीय खड्डा खाणला. निवडणुका जवळ येतील तशा हे रोज खड्डे खाणत जातील. देशातील वातावरण घाण झाले हे निश्चित आहे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवायचे हे आता लोकांना कळू लागले आहे. 

नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आताचे सरकार बेक्कार आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकीत मोदींवर असलेला राग मतांतून बाहेर पडला आहे. भाजप स्वतःच स्वतःचे खड्डे खाणत आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेतले. राज ठाकरे यांनी नुकतेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आज राज ठाकरे यांनी विविध मुद्दयांवर भाष्य करत मुलगा अमित ठाकरे याचे लग्न साध्या पद्धतीने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले

राज ठाकरे म्हणाले, ''पंतप्रधानपदासाठी गेल्या अनेक वर्षांत आपल्याला पर्याय होता का? त्यामुळे आताही आपोआप पर्याय पुढे येईल. राम मंदिराच्या मुद्द्यावरून सरकारचा दंगलीचा कट आहे. सरकार फक्त घोषणा करत आहे, सरकारकडे एक रुपया शिल्लक नाही. पैसा नाही मग कशाच्या जोरावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकार अनुदान देत आहे. येत्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची दुर्दशा होईल. सरकार जेवढे संगणकावर लक्ष ठेवेल, तेवढे त्यांना कळेल मोदींना शिव्या पडत आहेत. किती लोकांच्या घरात घुसणार आहात. नोटबंदीनंतर मी म्हणालो होतो, मोदींनी राजकीय खड्डा खाणला. निवडणुका जवळ येतील तशा हे रोज खड्डे खाणत जातील. देशातील वातावरण घाण झाले हे निश्चित आहे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवायचे हे आता लोकांना कळू लागले आहे. 

Web Title: MNS chief Raj Thackeray criticize Narendra Modi and BJP