मंत्र्यांना त्याच कांद्याने शुद्धीवर आणून पुन्हा मारा : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नाशिक : या सरकारमधील मंत्र्यांना निवेदनाची भाषा कळत नाही. मंत्र्यांना एवढे कांदे मारा, की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे, मग तोच कांदा त्याच्या नाकाला लावून शुद्धीवर आणा आणि पुन्हा मारा, असा आक्रमक सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) दिला आहे.

कांद्याला 200 रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच परराज्यात वाहतुकीसाठी अनुदान आणि कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा विचार सरकार करत आहे. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घातला आहे तेच शेतकरी यासाठी पात्र ठरतील, असे सरकारने म्हटले आहे.

पेठ येथे बोलताना राज ठाकरे म्हणाले, की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्यासमोर व्यथा मांडली. एवढी मेहनत करून निराशा येत असेल आणि सरकार तुम्हाला आश्वासन देण्यास तयार नसेल तर कांदे रस्त्यावर टाकण्याऐवजी मंत्र्यांना फेकून मारा. कांद्याला दिलेल्या 200 रुपये प्रतिक्विंटल अनुदानावर मी समाधानी नाही.

Web Title: MNS Chief Raj Thackeray Criticizes State Government on Onion Rate Issue