रस्याचे खड्डे दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन; निफाडच्या तहसिलदारांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

रस्त्यांची डागडुजी व खड्डे न बुजविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सरकारी कार्यालयावर रक्तदान करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन तसेच मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

निफाड - तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आक्रमक भुमिका घेत जिल्हा उपाध्यक्ष शैलेश दादा शेलार, सुयोग गायकवाड, गिरीष कसबे यांच्या नेतृत्वाखाली खाली निफाडच्या नायब तहसिलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्वच रस्त्याची खस्ता हालत झाली असुन येत्या २० ते २५ दिवसात जर रस्त्यांची डागडुजी व खड्डे न बुजविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सरकारी कार्यालयावर रक्तदान करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करुन तसेच मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सदरचे निवेदन निफाड तहसील, निफाड पोलिस स्टेशन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला यांना देण्यात आले. यावेळी मुकेश आवारे, रामराजे शिंदे, रविराज जाधव, निलेश सोनवणे, स्वप्निल थोरात, पवन जाधव, तुषार कारे, अभिजीत निकम,शोएब शेख, संग्राम दाभाडे, अक्षय शेलार, आकाश कदम, चेतन गडाख, अक्षय गोहाड, ऋषिकेश झुंबरे, बालाजी लगड, आकाश थोरात, अमित कापडी, जयश ढिकले, आंकुश गरुड, रोहित लबडे, विजय झुरडे, किरण सताळे, गणेश आहेर, निलेश ढिकले, योगेश पाटील, गोकुळ मोरे व इतर महाराष्ट्र सैनिक निफाड आदीं उपस्थितीत होते.

तालुक्यातील रस्त्याच्या बाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. आता बस झालं, येत्या वीस दिवसात रस्ते दुरुस्त करा अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन ठरलेले आहे. - शैलेश दादा शेलार, जिल्हा उपाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: MNS gives Application to Tahsildar of Niphad for bad condition of roads