वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

mob attack on police in shirpur gaon
mob attack on police in shirpur gaon

शिरपुर : कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना आज दुपारी दुर्बळया (ता.शिरपूर) येथे घडली. यात पोलिस उपअधिक्षक संदीप गावित, सहाय्यक निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पाच ते सात पोलीस जखमी झाले. दुर्बळया येथे काही दिवसांपूर्वी एका पुरुषाने आत्महत्या केली होती. त्याच्या नावावरील मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या कारणावरून त्याचे आई-वडील आणि सासरच्या मंडळीत वाद सुरू होता.

सहाय्यक निरीक्षक खेडकर यांच्या मध्यस्थीनंतर उभय पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचे मान्य केले होते. मात्र, हा पुन्हा वाद उफाळल्याने आज गावात आदिवासी समाज व दोन्ही पक्षांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात बैठक घेण्यासाठी पोलिस अधिकारी हजर होते. बैठक सुरू असतांनाच तेथील महिलांच्या जमावातून पोलिसांवर अचानक दगडफेक सुरू झाली. 

त्यातून सावरत नाहीत तोच पुरुषांचा जमाव लाठ्याकाठ्या घेऊन पोलिसांवर धावून गेला. या हल्ल्यात गावित, खेडकर यांच्या हातावर मार लागला. तर हवालदार संजय नगराळे, श्यामसिंह वळवी, अनंत पवार हे जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला कर्मचारी यमुना परदेशी या गरोदर असून जमावाने ढकलून दिल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्यानंतर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com