नाशिक कारागृहात पुन्हा सापडले पाच मोबाईल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नाशिक रोड - मध्यवर्ती कारागृहात बेवारस मोबाईल सापडण्याची मालिका थांबायला तयार नाही. शुक्रवारी (ता. 23) सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळी झडतीत तपासणी पथकाला पाच मोबाईल आढळले. एकाच आठवड्यात कारागृहात चौथ्यांदा मोबाईल आढळून आले. याबाबत नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रोज तपासणी पथकाला मोबाईल आढळत आहेत. काल सकाळी साडेसातच्या सुमारास तुरुंग अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कैद्यांच्या बराकीची अचानक तपासणी केली. त्या वेळी बराक सात विभाग दोनमधील एका कैद्यांची झडती घेतली असता त्याच्या खिशात मोबाईल आढळला. यानंतर सायंकाळी साडेपाच ते सव्वा सहाच्या दरम्यान पुन्हा पाहणी केली असता मंडल आठ मधील विभाग दोन येथील शौचालयाजवळ तीन बेवारस मोबाईल आढळले. खोली क्रमांक 146 जवळील खिडकीच्या फटीत एक बेवारस मोबाईल आढळला.

Web Title: mobile receive in nashik jail