मोबाईलचोर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नाशिक - नाशिक रोड रेल्वे स्थानक व मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रवाशांचे महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. मूळचा वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील राहणाऱ्या संशयिताकडून 75 हजार रुपयांचे चोरीचे पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले. सहायक निरीक्षक दीपक गिरमे यांना मोबाईल चोरटा सीबीएस परिसरात असल्याची खबर मिळाली होती. या पथकाने अनिल रामदास तुरकणे (मूळ रा. लाखगंगा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यास अटक करून चौकशी केली असता, त्याने मोबाईलचोरीची कबुली दिली. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांचे महागडे मोबाईल तो लंपास करायचा.

याशिवाय त्याने मेळा बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांचे मोबाईलही गर्दीचा फायदा घेत चोरले होते. त्याच्याकडे चोरीतील अनेक कंपन्यांचे महागडे मोबाईल सापडले. मोबाईलचोरीचेच्या संशयिताविरोधात नाशिक रोड व सरकारवाडा पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी त्यास सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: mobile theft arrested crime