कॉपी शोधण्यास मोबाईल ट्रॅकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

शहादा, (जि. नंदुरबार) - डिजिटल युगात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच मोबाईल ट्रॅकरचा वापर करण्यात येत आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी लोणखेडा (ता. शहादा) येथील केंद्रात हा उपाय करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला असून, कॉपीमुक्त अभियानासाठी लोणखेडा येथील केंद्रावर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलद्वारे कॉपी करणे शक्‍य असल्याने परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात मोबाईल बंदी करण्यात आली आहे. या केंद्रावर मोबाईलचा वापर शोधण्यासाठी प्रथमच मोबाईल ट्रॅकरचा उपयोग केला जात आहे. लोणखेडा केंद्रावर बारावीची परीक्षा सुरळीत पार पडत असल्याची माहिती केंद्र संचालक उपप्राचार्य डी. सी. पाटील यांनी दिली. किमान कौशल्य विभागाचे निदेशक अरविंद पाटील यांनी स्वतः तयार केलेल्या या यंत्राच्या साह्याने मोबाईलचे लोकेशन मिळते. परिणामी परीक्षार्थीने लपविलेला मोबाईलही ट्रॅक होत आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत लोणखेडा केंद्रावर दक्षता घेतली जात असून केंद्राच्या प्रवेशद्वारावर परीक्षार्थीची झडती घेऊन आत प्रवेश दिला जात आहे.

Web Title: mobile tracker for cheat searching