abhishek
abhishek

मोदी, शहा, फडणवीसांच्या मुखवट्यांना दुग्धाभिषेक 

जळगाव : कोळी समाजातील विविध प्रजातीच्या लोकांना भाजप सरकारने केवळ आश्‍वासने, भूलथापा दिल्या. परंतु त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाही. त्यामुळे या अन्यायाविरोधात आज वाल्मिकलव्य सेनेच्या वतीने वाल्मिकनगरात "मस्का मारो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुखवट्यांना दुग्धाभिषेक घालण्यात आला. 

आदिवासी टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी व इतर आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली. परंतु याचा काहीएक फायदा झाला नाही. भाजप सरकारने समाजाला याबाबत आश्‍वासन दिले. संपूर्ण समाज भाजपच्या बाजूने उभा राहिला. मात्र, सरकारला चार वर्षे होऊनही कोळी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यात आले नाही. त्यामुळे कोळी बांधवांनी आज भाजप नेत्यांचे मुखवटे लावून त्यांना दुधा-तुपाने त्यांचे स्नान करून मस्का लावण्यात आला. शासनाने या प्रश्‍नांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ यांनी दिला आहे. 

आंदोलनात भरत सपकाळे, बापू ठाकरे, दिलीप कोळी, गुलाब बाविस्कर, योगेश बाविस्कर, दौलत कोळी, अरुण इंगळे, कमलाबाई बाविस्कर, उर्मिला सपकाळे, कल्पना शंकपाळ, मंगलाबाई सोनवणे, वत्सलाबाई सोनवणे, योगिता सपकाळे, वैशाली कोळी, सपना कोळी, रतन सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com