‘मॉडिफाइड बाइक्‍स’वर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जळगाव - शहरातील मध्यवर्ती चौकातून प्रत्येक तिसऱ्या वाहनावर विचित्र नंबरप्लेटची वाहने धावत असताना वाहतूक पोलिसांची कारवाई तोकडी ठरत आहे. तर मॉडिफिकेशनच्या नावाखाली चित्रविचित्र पद्धतीने दुचाकी वाहने, डीजेसाठी मूळ चारचाकी वाहनांत विनापरवागीने फेरबदल करण्यात आल्याचे आढळून येते. अशा वाहनांवर कारवाई करून रामानंदनगर पोलिसांनी दोन महिन्यांत २९ हजारांचा दंड वसूल केला आहे.  

शहरात फिरणाऱ्या वाहनांच्या फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई करण्याचे आदेश वारंवार वरिष्ठांकडून दिले जातात. मात्र हे काम वाहतूक शाखेचे असल्याचे सांगत केवळ मेमो फाडून बोळवण होते. ठोस कारवाई मात्र अद्यापतरी कोणी करीत नव्हते. मात्र रामानंदनगर पोलिस ठाण्याने फॅन्सी नंबरप्लेट आणि मॉडिफाइड गाड्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक बिट अंमलदार, दुय्यम अधिकाऱ्यांकडून रोज किमान दहा वाहनांवर कारवाई केली जाते. स्वत: पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्या दिवसातून पाच, सात वाहनांवर कारवाई होत असल्याने कर्मचाऱ्यांना कारवाई करणे भाग आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल २९ हजार रुपयांचा रीतसर दंड या पोलिस ठाण्याने वसूल केला आहे. विचित्र नंबरप्लेट नंतर मॉडिफाइड वाहनांना थेट आरटीओ परवाना आणि न्यायालयात पाठवले जात असल्याने आठ ते दहा हजाराचा शासकीय दंड भरण्याची वेळ वाहन चालकावर येते. डीजेसाठी मालवाहतूक वाहनात बदल, महाविद्यालयीन विद्यार्थिनी विना परवाना सोईने तयार करवून घेतलेल्या मॉडिफाइड वाहने थेट जप्त करून न्यायालयात पाठवले जात आहेत.

‘ती’ नंबरप्लेट पाहून पोलिसही हबकले
निरीक्षक बापू रोहोम यांनी आज दोन विचित्र दुचाकी ताब्यात घेतल्या. त्यात एका दुचाकीची नंबरप्लेट पाहून निरीक्षक रोहोमही हबकले.शरीरातून जीव गेला तर चालेल मनातून ‘चुडेल’ जायला नको.. अशी नंबरप्लेट लावलेल्या तरुणाला रोहोम यांनी पोलिस ठाण्यात नेऊन अर्थ विचारला. त्यावर विद्यार्थी ओशाळतच गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने तिला चिडवण्यासाठी हे लिहिल्याचे त्याने सांगितले.  

Web Title: modified bikes police crime