वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणा... 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

डॉ. भागवत 21 नोव्हेंबरपासून नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याची रविवारी (ता.24) सांगता झाली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. भागवत म्हणाले, की जातीभेदाच्या उतरंडी पलीकडे जाऊन सर्व समाजात लवकर समरसता आणावी. गाय ही भारतीय कृषी, आरोग्य व पर्यावरणासाठी उपयुक्त असल्याने गोसेवा विषयात समाजाच्या सहकार्याने काम करण्याची आवश्‍यकता आहेअसे म्हणाले

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमधून व्यक्तिनिर्माणचे कार्य होत आहे. त्याचवेळी समाजजीवनातील वंचित घटकांना संपर्क व सेवाकार्यातून मुख्य प्रवाहात आणावे. गावाच्या सहकार्याने स्वच्छता, पाणी, संस्कार, आरोग्य आदींबाबत ग्रामविकास साधावा, असे प्रतिपादन संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघाच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्याच्या पश्‍चिम क्षेत्रातील विविध श्रेणीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. 

हेही वाचा >  VIDEO : 'हे' आमदार अद्यापही कुटुंबीयांसाठी "नॉट रिचेबल' 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन 
डॉ. भागवत 21 नोव्हेंबरपासून नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याची रविवारी (ता.24) सांगता झाली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. भागवत म्हणाले, की जातीभेदाच्या उतरंडी पलीकडे जाऊन सर्व समाजात लवकर समरसता आणावी. गाय ही भारतीय कृषी, आरोग्य व पर्यावरणासाठी उपयुक्त असल्याने गोसेवा विषयात समाजाच्या सहकार्याने काम करण्याची आवश्‍यकता आहे. जल, जंगल, जमिनीच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी पर्यावरणविषयक जागरूकता आणि सक्रियता आवश्‍यक आहे. 

क्लिक करा > "मला तुझ्याशी लग्न करायचे आहे', तिने नाही म्हटल्यावर....

विविध समाज घटकांशी त्यांच्या अनौपचारिक भेटी

नाशिक शहरातील सर्वनियुक्त संघ कार्यकर्त्यांची बैठक डॉ. भागवत यांच्या उपस्थितीत झाली. दैनंदिन संघकामातील बाल, तरुण, प्रौढ कार्यकर्त्यांच्यासमवेत त्यांचा संवाद झाला. याशिवाय संघ कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय आणि विविध समाज घटकांशी त्यांच्या अनौपचारिक भेटी झाल्या. संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी ही माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohan Bhagwat at Nashik Marathi Political News