"मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' नाही म्हटल्यावर त्याने तिला...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

नाशिक रोड, अंबड आणि गंगापूर परिसरात विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी या तीनही पोलिस ठाण्यांत विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोटमगाव (ता. नाशिक) येथे तिघांविरोधात पॉक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : गंगापूर येथील एस. टी. कॉलनीतील एका क्‍लिनिकमध्ये संशयित प्रसाद पवार (रा. जुने नाशिक) याने युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. 21) रात्री पावणेआठच्या सुमारास पीडिता क्‍लिनिकमध्ये असताना, संशयित पवार याने "मला तुझ्याशी लग्न करायचे आहे', असे म्हणाला असता पीडितेने नकार दिला. त्यानंतर संशयिताने पीडितेचा हात धरून अश्‍लिल कृत्य करीत विनयभंग केला.

रिक्षा थांब्याजवळून पायी जाताना पाठलाग

याप्रकरणी गंगापूर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गवळी तपास करीत आहे. तिसरी घटना अंबडच्या जाधव संकुलात घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास पीडिता जाधव संकुल येथील रिक्षा थांब्याजवळून पायी जात होती. त्यावेळी संशयित नीलेश याने तिचा पाठलाग केला. बदनामी करण्याची धमकी देत विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.  

हेही वाचा > 'हे' आमदार अद्यापही कुटुंबीयांसाठी "नॉट रिचेबल' 

वेगवेगळ्या घटनांमध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल  
नाशिक रोड, अंबड आणि गंगापूर परिसरात विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी या तीनही पोलिस ठाण्यांत विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोटमगाव (ता. नाशिक) येथे तिघांविरोधात पॉक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव रामदास घुगे, किशोर म्हस्के, विजय पगारे (सर्व रा. कोटमगाव, ता. नाशिक) असे संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित गेल्या महिनाभरापासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होते. शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटी असताना संशयित वैभव घुगे घरात शिरला. त्याने पीडितेशी अश्‍लिल चाळे करीत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यावेळी किशोर म्हस्के व विजय पगारे हे संशयित घराबाहेर थांबून होते. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत पॉक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. बी. राऊत करीत आहेत. 

क्लिक करा > ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Molestation of Girl at Nashik Crime Marathi News