Dhule Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

girl harrasment
girl harrasment esakal

शिरपूर (जि. धुळे) : कॅफेमध्ये कॉफी पाजण्याच्या बहाण्याने बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या संशयावरून दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (molestation of minor girl in cafe dhule crime news)

तीन महिन्यांपासून मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या संशयितांनी तिच्या काकालाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी संशयित पीडित मुलीस कॉफी पिण्याच्या बहाण्याने करवंद नाका परिसरातील एम.जे. कॅफे येथे घेऊन गेले होते.

तेथे एकांताचा फायदा घेऊन तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करून त्या क्षणांचे छायाचित्र काढले. ती प्रतिकार करून घरी जाण्याच्या प्रयत्नात असताना तिचे फोटो एडिट करून इन्स्टाग्रामवर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा वारंवार पाठलाग करून, छेड काढून शरीरसंबंधाची मागणी केली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

girl harrasment
Nandurbar News : स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर गावाने चक्क प्रथमच पाहिली बस..!

ती काकासोबत जात असताना रस्त्यावर त्यांना अडवून ढकलून दिले. त्यांच्या बोटाला चावून बरगड्यांवर व पोटात मारून जखमी केले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून करवंद (ता. शिरपूर) येथील संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तपास करीत आहेत.

girl harrasment
Nashik Crime News : वृक्षतोड करणाऱ्या दोघांना कारावास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com