स्वयंपाकघरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग

crime_woman
crime_woman

मेहुणबारे : घरात घुसून विवाहितेचा विनयभंग करून तिच्या पती आणि मुलीला काठ्यांनी मारहाण केल्याची घटना पिंप्री बुद्रूक (ता. चाळीसगाव) येथे आज (शनिवार) घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्री बुद्रूक येथील 38 वर्षीय महिला सकाळी 7.15 वाजेच्या सुमारास घरातील स्वयंपाकघरात काम करीत असताना गावातील भरत पाटील हा इसम घरात घुसला. त्याने विवाहितेला लज्जा वाटेल, अशा प्रकारचे वर्तन केले. विवाहितेने आरडाओरड केल्यानंतर तो तेथून पळून गेला. त्यानंतर शोभा पाटील, नामदेव पाटील, चेतन पाटील यांनी विवाहितेला, तिच्या पतीला आणि मुलीला शिवीगाळ करून काठ्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मेहुणबारे पोलिस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संजय पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com