तो विवाहितेला म्हणाला..मला तुझ्याशीच लग्न करायचयं..आणि मग त्यानंतर....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

शनिवारी (ता.९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या जाऊसोबत पीडिता शेतात गेली होती. जाऊ मुगाच्या शेंगांची आवरसावर करीत असताना, संशयित विशाल शिंदे हा पीडितेजवळ आला आणि त्याने "तू मला आवडतेच, मला तुझ्याशी लग्न करायचय". त्यावर पीडितेने माझे लग्न झाले असून नकार देताच संशयिताने तिचा हात धरून ओढले आणि अश्‍लिल चाळे केल्याने पीडितेने आरडाओरडा केला. त्यावेळी पीडितेचा दिर मदतीला धावून येताच संशयित विशाल शिंदे पळून गेला. परंतु थोड्याच वेळात त्याच्या सोबत संशयित केशव व दिनकर शिंदे हेही आले. तिघा संशयितांनी पीडितेसह तिच्या दिराला लाथ्याबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली.

नाशिक : नाणेगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या विवाहितेचा विनयभंग करून तिघांनी विवाहितेच्या दिराला मारहाण केल्याचा प्रकार घडला.

तर असा घडला प्रकार..

विशाल केशव शिंदे (२५), केशव गणू शिंदे (४५), दिनकर गेणू शिंदे (४२, सर्व रा.नानेगाव, ता.जि.नाशिक) असे संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या जाऊसोबत पीडिता शेतात गेली होती. जाऊ मुगाच्या शेंगांची आवरसावर करीत असताना, संशयित विशाल शिंदे हा पीडितेजवळ आला आणि त्याने तू मला आवडतेच, मला तुझ्याशी लग्न करायचेय. त्यावर पीडितेने माझे लग्न झाले असून नकार देताच संशयिताने तिचा हात धरून ओढले आणि अश्‍लिल चाळे केल्याने पीडितेने आरडाओरडा केला. त्यावेळी पीडितेचा दिर मदतीला धावून येताच संशयित विशाल शिंदे पळून गेला. परंतु थोड्याच वेळात त्याच्या सोबत संशयित केशव व दिनकर शिंदे हेही आले. तिघा संशयितांनी पीडितेसह तिच्या दिराला लाथ्याबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महिलांनो हे माहित आहे का तुम्हाला?

भारतीय समाजात स्त्रीयांना सतावणार्‍या अनेक त्रासांपैकी एक त्रास म्हणजे विनयभंग. स्त्री, मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू स्तरातील असो वा अगदी तळागाळातील असो, काही पुरूषांच्या विकृत प्रवृत्तीचा त्रास हा स्त्रीयांना होतच असतो. स्त्रीयांच्या भाषेत बोलायचे झाले तर पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा आणि शेर्‍यांचा त्रास स्त्रियांना सदैव सहन करावा लागत असतो. एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजागीपानाच्या अधिकाराचं उल्लंघन होईल असे वर्तन करणे. या अपराधासाठी भारतीय दंड विधान ३५४ नुसार १ वर्ष सजा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Molestation of Woman at Nashik Crime News

टॅग्स
टॉपिकस