तरुणीसह महिलेचा विनयभंग; वरखेडे परिसरात माथेफिरुचा पोलिस घेताहेत शोध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

याबाबत वृत्त असे, वरखेडे- पळासरे रस्त्यावर नवेगाव येथील अठरा वर्षीय तरुणी आज दुपारी बाराच्या सुमारास बकऱ्या चारत होती. त्यावेळी पळासरे रस्त्याकडून अज्ञात तरूण दुचाकीवरुन (क्रमांक- एम. एच. 15, जीजे 5201) आला व त्याने दुचाकी बाजूला लावून मुलीला पकडले. तिला खाली पाडून तिच्या चेहऱ्यावर त्याने नखे ओरबडून तिचा विनयभंग केला.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे तरूणीसह महिलेचा एका माथेफिरूने विनयभंग करून दोघींना जखमी केल्याची घटना आज दुपारी बारा ते दोनच्या सुमारास घडली. हे कृत्य करणारा माथेफिरू असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून माथेफिरूचा पोलिस शोध घेत आहेत. 

याबाबत वृत्त असे, वरखेडे- पळासरे रस्त्यावर नवेगाव येथील अठरा वर्षीय तरुणी आज दुपारी बाराच्या सुमारास बकऱ्या चारत होती. त्यावेळी पळासरे रस्त्याकडून अज्ञात तरूण दुचाकीवरुन (क्रमांक- एम. एच. 15, जीजे 5201) आला व त्याने दुचाकी बाजूला लावून मुलीला पकडले. तिला खाली पाडून तिच्या चेहऱ्यावर त्याने नखे ओरबडून तिचा विनयभंग केला. याचवेळी तिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी धावत आले. या दरम्यान, 'त्या' अज्ञात माथेफिरुन तेथेच आपली दुचाकी सोडून पळ काढला. त्याचे वर्णन मुलीला विचारले असता, त्याने अंगात लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली होती. त्यानंतर दरेगाव रस्त्यालगत मानेवरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतात हा तरूण लपून बसला होता. त्याला शेतात काम करणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेने पाहिले. आपल्याला महिलेने पाहिल्याचे लक्षात येताच त्याने 'हे शेत नितीनचे आहे का?' अस प्रश्‍न महिलेला केला. त्यावर 'तु कुठला आहे' असे महिलेने विचारल्यानंतर त्याने 'लहान वरखेडे' असे गावाचे नाव सांगितले.

त्यानंतर महिलेने मागे पाहताच, त्याने तिला पकडून विनयभंग केला. या झटापटीत महिलेच्या चेहऱ्यावर व गळ्यावर नखाने ओरबडल्याच्या जखमा झाल्या. महिलेने मोठमोठ्याने आरडाओरड केल्यानंतर तो शेतातून पळून गेला. हा प्रकार गावातील तरुणांसह ग्रामस्थांना कळताच सर्वांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, तो माथेफिरु कुठेही मिळून आला. पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी त्याची दुचाकी जप्त केली. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेतात काम करणाऱ्या महिलांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. रात्री उशीरापर्यंत जवळपास पाचशेच्यावर ग्रामस्थ बॅटरी घेऊन त्याचा शोध घेत होते. 

संशयित परिसरातील असावा -
संशयित माथेफिरूला महिलेने विचारल्यानंतर त्याने 'लहान वरखेडे' असा शब्दप्रयोग वापरला. त्यामुळे तो याच परिसरातीलच असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली असून त्याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

Web Title: Molestation of a young girl and a woman at varkhede taluka chalisgaon