PHOTOS : 'त्या' माकडाला काय माहीत होतं? विजेच्या तारेला पंजा लागला तर 'असं' होईल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

सप्तशृंगी गडावरील पहिली पायरीजवळील गणपती मंदिरालगत सप्तशृंगी देवी मंदीर व परीसराला विद्युत पुरवठा करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यात आले आहे. हे विद्युत रोहित्र हे गर्दीच्या ठिकाणी व मंदीर पायरी प्रवेशद्वाराजवळच असल्याने धोक्याचे आहेत. शनिवारी दुपारी गडावर दुसऱ्या ठिकाणावरुन आलेले नवखे माकड हे पहिल्या पायरीजवळील विद्युत रोहीत्रावर चढून उडी मारल्याने त्याच्या पंजाचा स्पर्श विद्युत वाहिनीस लागला.

नाशिक :  सप्तशृंगी गडावर जंगलातून नागरी वस्तीत उदरनिर्वाहासाठी आलेल्या 'त्या' माकडाला काय माहीत, की विजेच्या तारेला पंजा लागला तर काय होईल..? गडावरील पहिली पायरी परीसरात असलेल्या 'त्या' विद्युत रोहीत्राचा धक्का बसल्याने माकडाला प्राण गमवावे लागले आहे.  पहिल्या पायरीवरील धोकेदायक असलेला हा विद्युत जनित्र विद्युत वितरण कंपनीने इतरत्र हलविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 

झाले असे की.....

सप्तशृंगी गडावरील पहिली पायरीजवळील गणपती मंदिरालगत सप्तशृंगी देवी मंदीर व परीसराला विद्युत पुरवठा करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यात आले आहे. हे विद्युत रोहित्र हे गर्दीच्या ठिकाणी व मंदीर पायरी प्रवेशद्वाराजवळच असल्याने धोक्याचे आहेत. शनिवारी दुपारी गडावर दुसऱ्या ठिकाणावरुन आलेले नवखे माकड हे पहिल्या पायरीजवळील विद्युत रोहीत्रावर चढून उडी मारल्याने त्याच्या पंजाचा स्पर्श विद्युत वाहिनीस लागून जोरदार विद्युत धक्का बसल्याने जागीच ठार झाले. तर दुसऱ्या माकडास काहीसा धक्का बसला. मात्र ते सुदैवाने वाचून त्याने घटनास्थळावरुन पलायन केले.

No photo description available.

दरम्यान याबाबतची माहीती वनविभागास तसेच विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळविल्यानंतर विद्युत कर्मचारी व वन विभागाचे अभोणा परिमंडळाचे अधिकारी योगीराज निकम, वनकर्मचारी अमृत पवार यांनी घटनास्थळी धाव घेवून विद्युत पुरवठा खंडीत करीत जनित्रावरुन मृत माकडास खाली उतरवून पंचनामा केला. दरम्यान मृत माकडास अभोणा येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अभोणा वन परीमंडळ कार्यालयाच्या परीसरात माकडावर अंत्यसंस्कार  करण्यात आले. 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

Image may contain: 4 people, including Prasad Kathe, people standing, tree, child and outdoor

रोहित्र इतरत्र हलविण्यासाठी कार्यवाही नाही

याबाबत नवरात्रोत्सव, चैत्रोत्सवा दरम्यान यात्रोत्सव आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, प्रांत अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना स्थानिक व्यापारी, ग्रामपंचायत, ट्रस्ट व वनविभागाने सदरच्या धोकेदायक रोहित्राचा प्रश्न उपस्थित करुन सदरचे रोहित्र विद्युत वितरण कंपनीने इतरत्र मोकळ्या जागेत हलविण्याची मागणी केली होती. व तसा पत्रव्यवहारही संबधितांकडून करण्यात आला होता. यावेळी रोहित्र तातडीने हलविणे शक्य नसल्याने यात्रोत्सव काळात सुरक्षतेच्या दृष्टीने उपाय योजना म्हणून रोहित्राच्या खांबाभोवती संरक्षक जाळी लावली होती. मात्र त्यानंतर रोहित्र इतरत्र हलविण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली नाही.

हेही वाचा > PHOTO : "समजून सांगा.. नाहीतर तिला जिवंत नाही ठेवणार" मुलीचे आईवडील न्यायाच्या प्रतिक्षेत..​

Image may contain: 3 people, people standing, fire and outdoor

त्वरित कार्यवाही करण्याची मागणी
पहिल्या पायरीजवळील विद्युत वितरण कंपनीने उभे केलेले विद्युत जनित्र हे गर्दीच्या ठिकाणी असल्याने हे दुसऱ्या ठिकाणी हलविण्याबाबत ग्रामस्थांच्यावतीने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी करणार आहोत.- प्रकाश कडवे, भाजपा शहराध्यक्ष सप्तशृंगी गड

सदरचे विद्युत रोहीत्र भाविकांच्या दृष्टीने धोकेदायक असल्याने तसेच या अगोदरही या रोहित्राचा विजेचा धक्का बसुन माकड जखमी झाल्याच्या घटना घडल्याने ग्रामपंचायती मार्फत विद्युत वितरण कंपनीस पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र अद्याप विद्युत वितरण कंपनीने कार्यवाही केलेली नाही. ग्रामपंचायती मार्फत पुन्हा स्मरणपत्र देवून याबाबत कार्यवाही करण्यात येईल.- राजेश गवळी, उपसरपंच, सप्तशृंगीगड

 VIDEO : रात्रभर शिकारच्या नादात 'ती' फिरत होती..फिरताना विहीरीत अचानक...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monkey died due to electricity shock at Nashik Marathi News