Dhule News : सप्तशृंगगडाच्या यात्रेसाठी धुळे विभागातून सुटल्या २०० बसेस

saptashrungi fort
saptashrungi fortesakal

धुळे : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगगडावर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी खानदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक गडावर जात असतात. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा प्रमाणात बसेस सोडण्यात आल्या आहेत. (more buses have been released for saptashrungi gad yatra dhule news)

सप्तशृंगगडावर होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी एसटी महामंडळाच्या धुळे विभागातर्फे जादा वाहतुकीचे नियोजन केले जाते. यंदा धुळे विभागातून गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी सुमारे २०० बसेस उपलब्ध झाल्या आहेत. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आगारांमधून ३० मार्चपासून सप्तशृंगगडावर जाण्यासाठी बसेस सुटत आहेत.

धुळे आगारातून प्रत्येक १५ मिनिटाच्या कालावधीत भाविकांसाठी बसेस उपलब्ध आहेत. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. सहा एप्रिलपर्यंत बसेस धावणार असून धुळे विभागातर्फे श्री सप्तशृंगगडावर मिनी बसस्थानक उभारले गेले आहे. या बसस्थानकात फक्त धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बसेस थांबणार आहेत.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

saptashrungi fort
Sakal Exclusive : आरोग्‍य धोरणात IMA असावी नोडल एजन्सी; राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अगरवाल यांची भूमिका

या बस स्थानकातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांना परतीसाठी बसेस मिळतील. यात्रा काळात नादुरुस्त बसेसच्या देखभालीसाठी यांत्रिक कर्मचारी उपलब्ध असतील. वाहतुकीच्या नियोजनासाठी विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे.

"दरवर्षीप्रमाणे यंदा धुळे एसटी विभागामार्फत जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले असून भाविकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करावा. तसेच ४४ प्रवाशांचा गट असल्यास गावापासून ते थेट सप्तशृंगगडापर्यंत बस उपलब्ध करून देण्यात येईल." - विजय गीते, विभाग नियंत्रक, धुळे एसटी महामंडळ

saptashrungi fort
Vedokt Controversy : महंत सुधीरदास यांनी स्पष्टपणे माफी मागावी : करण गायकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com