सकाळच्या बातमीने शाळांना मिळाले ई-लर्निंग कीट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

सोलापूर - ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ या मालिकेतील शाळांपैकी ३९ शाळा निवडून त्या शाळा मॉडेल बनविल्या जातील. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनकडून प्रयत्न करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात या शाळांना ‘इंटरॲक्‍टिव इ-लर्निंग कीट’ भेट देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी आज ‘सकाळ’ला भेट दिल्यानंतर सांगितले.

सोलापूर - ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ या मालिकेतील शाळांपैकी ३९ शाळा निवडून त्या शाळा मॉडेल बनविल्या जातील. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनकडून प्रयत्न करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात या शाळांना ‘इंटरॲक्‍टिव इ-लर्निंग कीट’ भेट देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी आज ‘सकाळ’ला भेट दिल्यानंतर सांगितले.

‘सकाळ’ने सर फाउंडेशनच्या माध्यमातून ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. जिल्ह्यातील शाळा गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवीत आहेत. परंतु, त्यांना समाजाकडून मदतीची गरज आहे. हे लक्षात आल्यानंतर प्रिसिजन फाउंडेशनकडून यातील ३५ शाळांना यंदाच्यावर्षी प्रोजेक्‍टर, आयआर कॅमेरा, अभ्यासक्रम लॅपटॉप, टॅब, प्रिंटर (इंटरॲक्‍टिव इ-लर्निंग कीट) देण्यात येणार आहे. 

या शाळांमध्ये जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी शाळांचा समावेश आहे. मदत देण्यात येणाऱ्या शाळांच्या कामगिरीचे निरीक्षण फाउंडेशनकडून करण्यात येणार आहे. या शाळात आगामी वर्षभरात चांगले उपक्रम कायम सुरू राहिल्यास पुढील वर्षी या शाळांतील मुलांना टॅब देण्याचाही मानस डॉ. शहा यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी तीन-चार वर्षांत या शाळा मॉडेल शाळा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शिक्षणासाठी चांगले उपक्रम कोणी राबवीत असल्यास त्यांनाही फाउंडेशनकडून शैक्षणिक मदत देण्याची आमची तयारी आहे, असेही डॉ. शहा यांनी सांगितले.

‘सकाळ’ने केले प्रबोधन

जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शाळांची माहिती लाखो लोकांपर्यंत पोचविण्यामध्ये ‘सकाळ’चा सिंहाचा वाटा आहे. ‘सकाळ’ने या मालिकेद्वारे उत्कृष्ट प्रबोधन केल्याचेही डॉ. शहा यांनी सांगितले.

या शाळांना मिळणार कीट

जिल्हा परिषद शाळा -

महापालिका हद्दीत असलेल्‍या जिल्‍हा परिषेदच्‍या शाळा ः मार्कंडेयनगर, शेटे वस्ती, विडी घरकुल. 

दक्षिण सोलापूर : तीर्थ, तीर्थ (कन्नड), टाकळी (कन्नड), उर्दू स्कूल (बरूर), मराठी स्कूल (बरूर), माळकवठे, कुसूर, वडापूर, येळेगाव, शिवणी, अकोले मंद्रूप, टिकेकरवाडी. 

अक्‍कलकोट : कोन्हाळी, ब्यागेहळ्ळी, जेऊर. 

उत्तर सोलापूर : मजरेवाडी, लोकुतांडा, पडसाळी, बेलाटी. 

मोहोळ : मोहोळ शाळा क्रमांक चार, पोखरापूर, पेनूर, इंगोले वस्ती, पापरी. 

(याशिवाय महापालिका हद्दीतील चार व खासगी चार शाळांनाही अशा प्रकारचे कीट ‘प्रिसिजन’कडून देण्‍यात येणार आहे.

Web Title: The morning got the news, schools, e-learning kit