आग्या मोहाळाच्या माशांचा भाविकांवर हल्ला; 12 जखमी

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

- मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले

वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत त्यातील स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले, अशी माहिती न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.

नगरसुल येथील काही भाविक दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी पायी दिंडीने सप्तशृंगी गडावर येत असतात. ही दिंडी प्रथम मार्केण्ड ऋषींचे दर्शन घेवून सप्तशृंगी गडावर जातेे. आज सकाळी दिंडी मार्केण्डेय पर्वतावर येणार असल्याने नगरसुल येथील दहा स्वयंमसेवक भाविक दिंडीतील भाविकांची जेवण नाष्ट्याची सोय करण्यासाठी सकाळी सहा वाजता वाहनाने मुळाणे बारी येथे आले होते. गाडी मुळाने बारी येथे लावून पर्वत चढत असताना मार्केडेय ऋषीच्या मंदीर परिसरात सकाळी साडेसातच्या सुमारास आग्या मोहळातील माशा अचानक शरद कारभारी अंभग, (वय ४०) यांच्यावर हल्ला केला. यावेळी अंभग यांंना वाचवण्यासाठी व माशा हुसकावण्यासाठी धावून गेलेल्या योगेश रामनाथ घाडगे (वय ३०), गणेश विठ्ठल बोराडे (वय १८), अरुण रखमा धनवटे (वय ३८), नंदू शिवाजी रावते, (वय ३४), किशोर विलास जाधव वय २८, गुलाब जाधव ५२, अविनाश पैठणकर ४२ , नितीन जाधव २७ यांच्यावरही माशांनी हल्ला चढविला.

यावेळी घटनेची माहिती नगरसुल येथील सुनिल पैठणकर यांना कळविल्यानंंतर त्यांनी त्वरीत सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना दिली. दहातोंंडे यांनी त्वरीत ट्रस्टचे वैद्यकिय अधिकाऱ्यांसह शीघ्र कृती दलाचे स्वयंसेवकांना घटनास्थळी रवाना केलेे. याचवेळी सुनिल पैठणकर यांनी प्रांत कार्यालय व आमदार छगन भुजबळ यांना माहिती दिली. तसेच दादा भुसे यांनाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोघांनीही आरोग्य यंत्रणा व आपतकालीन पथकास संपर्क करुन मदत कार्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, न्यासाच्या शीघ्र कृतीदलाच्या स्वयंसेवक साडे नऊपर्यंत घटनास्थळी पोहचूूून माशांना हुसकावण्यासाठी धुर करुन करुन माशांना साडे चार तासाच्या अथक परिश्रमानंतर हुसकावण्यात यश मिळवून माशांच्या चाव्यात गंभीर जखमी झालेल्या शरद अंभग व अरुण धनवटे यांना स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने डोली व स्ट्रेचरचा उपयोग करीत तर अन्य आठ जखमी भाविकांही  मुळाने बारी येथे उतरविण्यात आले.

जखमींना उतरण्यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुुुुका वैद्यकिय अधिकाऱ्यांसह उपस्थित असलेल्या पथकाने जागेवर तातडीने उपचार करुन पुढील उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात १०८ व देवी संस्थानच्या रुग्णवाहिकेतू दाखल करण्यात आले. येथेे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, याचवेळी जुनी बेज, ता. कळवण येथील निलेश भास्कर बच्छाव, वय २९ व धनश्री निलेश बच्छाव, वय.२३ हेही दर्शनासाठी पर्वत चढत असतांना त्यांच्यावरही माशांनी हल्ला केला. यावेळी ते अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतत मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी मदतीसाठी दाखल झालेल्या १०८ रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार करुन घरी रवाना करण्यात आलेे आहे. या मदत कार्यात ट्रस्टचे स्वंयसेवक प्रशांत निकम, सचिन पैठणकर, सोमनाथ गवळी,  तुषार जाधव, वैद्यकिय अधिकारी डॉ. जितेंद्र बिरारे, शांताराम बेनके, रवि गांगुर्डे, बाजीराव गावित, दीपक पवार, निवृत्ती बर्डे,  मोहन गोधडे आदींसह जिल्हा आपत्ती प्राधिकरण व वैद्यकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मदत कार्य केले.

Web Title: Mosquito Attack on Devotees 12 Injured in Nashik