#TuesdayMotivation लेकीच्या स्वप्नांना आईच्या कष्टाचं बळ..!

vishranti shambharkar.jpg
vishranti shambharkar.jpg

नाशिक : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न सगळेच बघतात, पण टिकतात अन जिंकतात तेच जे कितीही अडचणी आल्यात तरी ध्येय्यावर ठाम राहतात. अशाच प्रकारे आपल्या ध्येय्यावर ठाम राहत पायल भोजराज शंभरकर या तरुणीने नुकतीच गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली. या पदासाठी तिचे कष्ट होतेच पण तिच्या स्वप्नांची शिल्पकार होती ती पेट्रोलपंपावर काम करत आपल्या मुलीच्या पंखात बळ भरणारी आई अर्थात विश्रांती शंभरकर.......

यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील वाठोडा गावातच पायलची जडणघडण झाली. फार फार तर बारावी झाली की लग्न लावून मोकळ व्हायचं हि इथली मानसिकता. त्यातच बारावीला साधारण गुण मिळवल्याने शिकून काय करणार म्हणून आजूबाजूला लग्नाची सुरु झालेली चुळबुळ तर दुसरीकडे शिक्षणाच्या जोरावर आपल्या घरची परिस्थिती बदलण्याची खुणगाठ पायलने बांधली. अशातच अभियांत्रिकी प्रवेशासाठी ती पात्र ठरल्याने लग्नाचं संकट टळले मात्र शिक्षणासाठी खरा संघर्ष सुरु झाला तो इथूनच.

"तुला कष्ट घ्यायचे तर अभ्यासासाठी घे, शिक्षणच सर्व परिस्थिती बदलेल"
 दिवसेदिवस आर्थिक चणचण भासू लागली म्हणून पायलच्या आईने पेट्रोल पंपावर काम करत पायलला प्रोत्साहन दिले. पायलने देखील याची जाणीव ठेवत बारा-बारा तासाच्या वर अभ्यास केला, पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या आईचे कष्ट बघून मिळेल ते काम करून आईला आधार द्यावा असे तिला वाटे पण, "तुला कष्ट घ्यायचे तर अभ्यासासाठी घे, शिक्षणच हि सर्व परिस्थिती बदलेल" या भाषेत कायमच विश्रांती पायलला बजावत. अशातच आधार देणाऱ्या आईचा अपघात झाल्याने पायल पुरती खचली त्यातच पोलीस उपनिरीक्षक मैदानी चाचणीत अपयश आल्याने तोंडचा घास हिरावला गेला. पायल काहीशी नैराश्यात गेली असताना विश्रांती ह्या अपघातातून सावरल्या अन पुन्हा पेट्रोलपंपावर काम करत पायलला धीर देत तिच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. 

स्वप्नापासून पळ काढणाऱ्या परीक्षार्थींसाठी पायल एक आदर्श

पायलसाठी हीच मोठी प्रेरणा होती ह्याच जोरावर तिने भरपूर अभ्यास करत नुकतीच गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपनिरीक्षक ह्या पदाला गवसणी घातली. सध्या तिचे पुणे येथे प्रशिक्षण सुरु असून परिस्थितीला दोष देत स्पर्धा परीक्षा म्हणा की स्वप्नापासून पळ काढणाऱ्या परीक्षार्थीसाठी ती एक आदर्श ठरत आहे .



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com