ओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर चित्रपटनिर्मितीची लगबग सरकार दरबारातून सुरू झाली आहे. 

नाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर चित्रपटनिर्मितीची लगबग सरकार दरबारातून सुरू झाली आहे. 

सरकारने त्यासाठी २० कोटींचे ‘बजेट’ आखले आहे. खुल्या बाजारातून ई-निविदाप्रक्रिया राबवून चित्रपटनिर्मिती करून त्याचे वितरण केले जाईल.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चित्रपट निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १५ मार्च २०१३ ला चित्रपट निर्मितीची जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली. मात्र, महामंडळाने चित्रपट निर्मितीला विलंब केला. त्यामुळे आता विशिष्ट कालावधीत चित्रपटनिर्मिती करण्यासाठी ई-निविदा मागवून योग्य संस्थेची निवड करण्याचा निर्णय ९ मार्च २०१८ ला घेण्यात आला. मंगळवारी (ता. १३) या संदर्भात सुधारित निर्णय सरकारने जारी केला आहे. चित्रपटाची निर्मिती ऐतिहासिक सत्याला धरून होत असल्याची खात्री करणे, निर्मिती प्रक्रियेवर देखरेख ठेवणे यासाठी तज्ज्ञ जाणकारांची समिती गठित करण्यात आली आहे. 

चित्रपटाचा खर्च सामान्य प्रशासन विभागाच्या लेखाशीर्षातील मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे. ‘बजेट’मधील खर्च कोणत्या बाबीवर किती करावयाचा आहे, याचेही स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आले आहे.

Web Title: Movie on Mahatma Phule for OBC Voting Politics