फिरते प्रयोगशाळा वाहन उपलब्ध करुन देणार - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

चाळीसगाव : ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याद्वारे गावातील व्यक्तींचा विकास होण्यासाठी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मुलांनी नवनविन प्रयोगाच्या प्रतिकृती सादर केल्या आहेत. खेड्यापाड्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांना याचा लाभ व्हावा. याकरीता हे विज्ञान व तंत्रज्ञान गावोगावी पोहचणे आवश्यक आहे. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून फिरते प्रयोगशाळा वाहन उपलब्ध करुन देण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. 

चाळीसगाव : ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याद्वारे गावातील व्यक्तींचा विकास होण्यासाठी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मुलांनी नवनविन प्रयोगाच्या प्रतिकृती सादर केल्या आहेत. खेड्यापाड्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांना याचा लाभ व्हावा. याकरीता हे विज्ञान व तंत्रज्ञान गावोगावी पोहचणे आवश्यक आहे. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून फिरते प्रयोगशाळा वाहन उपलब्ध करुन देण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी केले. 

सर्वसामान्य नागरीकांना, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी देवकर मळा, लक्ष्मी नगर, चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, 43 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आज तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले, वस्तुंचे वाटप पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे, जि. प. शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष के. बी. साळुंखे, चाळीसगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आशाताई चव्हाण, पारोळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करन पवार, यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य व नगरसेवक उपस्थित होते. 

पालकमंत्री पुढे म्हणाले की, जनता सुखी, आनंदी आणि सुरक्षीत असली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे. लोकांचा विकास व्हावा, त्यांचे जीवन समृध्द व्हावे यासाठी शासन विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवित असते. सर्वसामान्य जनतेला या योजनांचा लाभ मिळावा, त्यांना योजनांची माहिती व्हावी याकरीता आमदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि महसूल व कृषी विभागाच्या सहकार्याने येथे शासकीय योजनांची जत्रा, कृषी महोत्सव, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन असा तिहेरी संगम होणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी मनापासून काम केल्यानेच या जत्रेसारखे कार्यक्रम यशस्वी होत असल्याचेही त्यांनी आर्वजून सांगितले. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले, वस्तुंचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमात  दारिद्रयरेषेचे दाखले,  लाभ क्षेत्राचा दाखला, विवाह नोंदणी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व्यक्तीगत शौचालयाचे अनुदान, गाय गोठा शेडसाठी प्रशासकीय मान्यता व वर्क ऑर्डर, कांदाचाळ मंजूरी आदिंचे लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात आमदार उन्मेश पाटील यांनी शासकीय योजनांच्या जत्रेचे आयोजन करण्यामागील आपली भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री  व उपस्थित मान्यवरांनी या जत्रेत, विज्ञान प्रदर्शन व कृषी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध शासकीय विभागांच्या व खाजगी स्टॉल ला भेट देऊन पाहणी केली.

Web Title: moving experiment vehicle available at village said by chandrakant patil