खासदार भारती पवारांच्या उपस्थितीत नांदगावची पहिलीच बैठक वादळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

मांडवडचे सरपंच विठ्ठलआबा आहेर यांनी तालुक्यात सध्या पाण्याच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित करताना टँकरमधून बारा आठ हजार लिटर पाणी दिले जाते. हा मुद्दा उपस्थित केला. तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीची एकतीस टँकर मान्यतेचा प्रस्तावावर या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. आठ-आठ दिवस प्रस्ताव पाठवूनही येवल्याचे प्रांत कार्यालयाकडे ते प्रलंबित राहतात. यावरून बैठकीला वादळी स्वरूप आले पर्यवेक्षक असलेल्या शरद पगार यांनी दिलेल्या माहितीची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी खातरजमा करण्याचा प्रयत्न केला.

नांदगाव : नवनिर्वाचित खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेली दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक आरोप-प्रत्यारोपाने वादळी ठरली. खासदार डॉक्टर भरती पवार यांचा पहिलाच दौरा त्यामुळे गाजला शिवाय निर्णयप्रक्रिया करा, टाळाटाळ करू नका असा इशारा देणारे पवारांचे रूप पाहायला मिळाल्याने आढावा बैठकीचे सूप अशा पद्धतीने वाजले.

तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असूनही यंत्रणा काम करीत नसल्याच्या मुद्दयावर बैठकीला उपस्थितीत कार्यर्त्यांनी मांडलेल्या गाऱ्हाण्याची तातडीने दाखल घेत खासदार डॉक्टर पवारांनी प्रशासकीय यंत्रणेला जागीच खडे बोल सुनावले. पाण्याच्या टँकरबाबतच्या कार्यवाहीच्या अंमलबजावणीच्या सूचना केल्यात येथील तहसील कार्यालयात नवनिर्वाचित खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. चारा टंचाई पिण्याच्या पाण्याचे टँकर त्यातील गळतीचे प्रमाण स्वस्त धान्य दुकानातून गायब झालेला धान्याचा पुरवठा इत्यादी मुद्दयांवर प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरण्यात आले. माजी उपसभापती सुभाष कुटे यांनी पालकमंत्री चारा छावणी सुरु करणार होते. त्याऐवजी डेपो सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची आठवण करून देत कधी चारा डेपो सुरु करणार असा प्रश्न उपस्थितीत केला.

मांडवडचे सरपंच विठ्ठलआबा आहेर यांनी तालुक्यात सध्या पाण्याच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित करताना टँकरमधून बारा आठ हजार लिटर पाणी दिले जाते. हा मुद्दा उपस्थित केला. तालुक्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीची एकतीस टँकर मान्यतेचा प्रस्तावावर या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. आठ-आठ दिवस प्रस्ताव पाठवूनही येवल्याचे प्रांत कार्यालयाकडे ते प्रलंबित राहतात. यावरून बैठकीला वादळी स्वरूप आले पर्यवेक्षक असलेल्या शरद पगार यांनी दिलेल्या माहितीची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे बघत खासदार डॉक्टर पवार यांनी माहिती घेतली. तेव्हा येवल्यातून त्रुटी लागल्याने हे एकतीस प्रस्ताव पुन्हा नांदगावला पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी विलंबाचा मुद्दा उपस्थित केला. कांदे यांनी टँकरची निकड असूनही साचेबंद पद्धतीने काम कसे करता यावर आक्रमक भूमिका स्वीकारली भाजपचे जिल्हाप्रमुख दादासाहेब जाधव यांनी हस्तक्षेप करीत कांदे यांची समजूत काढली व वादावर पडदा पडला. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर खासदार डॉक्टर भारती पवार यांनी प्रांताधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याची सूचना केल्यावर आज रात्री उशिरापर्यंत त्रुटी दूर करून मान्यता देण्याची प्रशासनाने मान्य केल्याने वादंग शांत झाले. भाजपचे गणेश शिंदे यांनी तालुक्यात नववद हजार शिधापत्रिका धारकांना धान्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचं मुद्दा उपस्थित केला. माजी आमदार संजय पवार, नगराध्यक्ष राजेश कवडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रत्नाकर पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे शहरप्रमुख सुनील जाधव उमेश उगले संजय सानप,इत्यादी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Bharti Pawar overview on drought situation