महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज राज्यसेवा पूर्वपरीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक यांसह वर्ग एक व दोनच्या विविध पदांसाठी राज्य सेवा पूर्वपरीक्षा उद्या (ता. 2) होत आहे. एमपीएससीची परीक्षा राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेला सुमारे एक लाख 98 हजार उमेदवार प्रविष्ट आहेत. सकाळी अकरा ते दुपारी तीन दरम्यान प्रत्येकी दोन तासांच्या दोन पेपरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्यभरात सुमारे दहा हजार अधिकारी व कर्मचारी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक अशा कामांसाठी नेमले आहेत. उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी मोबाईल किंवा कोणतेही संपर्क उपकरण बाळगणे, वापरणे किंवा तसा प्रयत्न करणे हा गुन्हा असून, असा प्रकार किंवा प्रयत्न आढळल्यास उमेदवारी रद्द करणे, आयोगाच्या भविष्यातील परीक्षांसाठी बंदी घालणे व पोलिसांत फौजदारी गुन्हा नोंदविणे अशी कडक कार्यवाही केली जाणार असल्याचे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: mpsc prelims exam today