'एमपीएससी'साठी अभ्यासिका हाउसफुल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

71 टक्के मुलांना करिअरसाठी शासकीय सेवाच सर्वोत्तम पर्याय
नाशिक - वर्षभर राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) तयारीसाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला सध्या गती आली आहे.

"एमपीएससी'च्या पूर्वपरीक्षा 29 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

वाचनालय, अभ्यासिका, क्‍लासेसमध्येही विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी संख्या वाढताना दिसत आहे. एकूण 155 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. शहरातील अभ्यासिकांमध्ये सध्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. सकाळी आठपासून रात्री नऊपर्यंत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये अवघड समजल्या जाणाऱ्या गणित, इंग्लिश, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, सामान्यज्ञान, राज्यशास्त्र या विषयांवर सध्या विद्यार्थ्यांचा भर आहे. अभ्यासासाठी आता खूपच कमी वेळ हातात असल्याने विद्यार्थी जीव ओतून अभ्यास करीत आहेत.

Web Title: mpscexam to study Housefull