मुलीच्या वाढदिवशी गुणवंत विद्यार्थ्यांना मदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

निफाड : "तुझ्या कृपेने रे होतील, फुले पत्थराची...' ही परमेश्वराची आळवणी तेव्हाच सार्थ ठरते जेव्हा या काव्यपंक्तीला साजेल असे व्यक्तीमत्व आजुबाजुला दिसतात. अगदी असाच अनुभव रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या सेवक व विद्यार्थ्यांना आज आला.

निफाड : "तुझ्या कृपेने रे होतील, फुले पत्थराची...' ही परमेश्वराची आळवणी तेव्हाच सार्थ ठरते जेव्हा या काव्यपंक्तीला साजेल असे व्यक्तीमत्व आजुबाजुला दिसतात. अगदी असाच अनुभव रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या सेवक व विद्यार्थ्यांना आज आला.

रुई येथील भूमीपुत्र मा.डॉ. बिलाल सांडुभाई शेख यांच्या शाळा सदिच्छा भेट व देणगीच्या कार्यक्रमात हा एक चांगला अनुभव विद्यार्थी व शिक्षक वर्गाला घेता आला. आपल्या कन्येच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ.शेख दाम्पत्याने विद्यालयातील अकरावी सायन्सच्या वर्गात शिकणारी वैष्णवी ठोंबरे या विद्यार्थीनीस रुपये 5 हजारांचा चेक प्रदान केला. तसेच या गरीब व होतकरु विद्यार्थिनीस दत्तक घेण्याचा मानस व्यक्त केला व उच्च शिक्षणाचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली.

आज समाजातील माणुसकी दिवसागणीक कमी होत असताना, डॉ.बिलाल यांच्यासारखे व्यक्ती समोर आले म्हणजे माणुसकीवरचा विश्वास दृढ होण्यास बळ मिळते.

डॉ.शेख यांचे विद्यालयावर खूप प्रेम आहे. प्रतिवर्षी कर्मवीर जयंतीप्रसंगी ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बक्षिसांच्या रुपाने प्रोत्साहन देत असतात. या कार्यक्रम प्रसंगी आपल्या कमाईतील काही वाटा समाजाचे ऋण फेडण्यासाठीच वापरला पाहीजे,"कितीही संपत्ती जमवून ठेवली,आणि माणूसकी ही संपत्तीच जर जपली नाही तर आपल्या पैशाला काहीही किंमत नसते, हा बहुमोल संदेश डॉ.बिलाल सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक प्रदीप लोणारी होते. लोणारी सरांच्या हस्ते मा, डॉ.शेख यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन घनश्याम मोरे यांनी केले. आभार तेलोरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धोंडगे, वसावे, पाडवी, डगळे, हिंगे, गायकवाड, पोटे, जाधव, शिंदे, गवळी यांनी प्रयत्न केले.

Web Title: mr shekh help intelligent students on his daughters bday