बाजारात खरेदीची गर्दी आणि बत्तीगुल...

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

निवडणूका संपल्यापासून पावसाने थोडी उघडीप दिल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत एकच झुंबड उडाली होती. गर्दीपाहुन व्यापारी सुखावला होता मात्र (ता.२६) खरेदीचा दिवस असल्याने सायंकाळी शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी झुंबड उडाली असतांनाच वीज वितरण कंपनीने वीज घालवत व्यापाऱ्यांसह खरेदीला आलेल्या नागरिकांना दिवाळीचा शॉक दिला.

मनमाड : विधानसभा निवडणुका त्यात परतीच्या पावसाचा फटका यामुळे ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात बाजारपेठ ठप्प झाली होती मात्र काल पासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली असतांनाच (ता.२६) मनमाडमध्ये सायंकाळी ऐन धंद्यापाण्याच्या वेळी वीज गायब करत वीज वितरण कंपनीने व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिवाळीचा चांगलाच शॉक दिला त्यामुळे नागरिकांना अंधारातच खरेदी करावी लागली. 
        

Image may contain: night and indoor

खरेदीला आलेल्या नागरिकांना दिवाळीचा शॉक  
राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकीची धामधूम त्यात दिवाळीसारखा सनसुद जवळ आल्याने अगोदरच ठप्प झालेला व्यापार पुन्हा तेजीत येईल असे व्यापाऱ्यांना वाटले होते मात्र निवडणूक त्यात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपल्याने दिवाळीची मंदीत जाते की काय असे व्यापाऱ्यांना वाटले होते. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतपिकाचा घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिसकवला गेला. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला तर नोकरदारांना बोनस पगार होऊनही बाजारपेठेत दिवाळीची तेजी येत नव्हती व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या सुरवातीला माल भरून ठेवला. मात्र निवडणूक परतीचा पावसामुळे ग्राहक फिरकायला तयार नाही निकाल लागताच निवडणूका संपल्यापासून पावसाने थोडी उघडीप दिल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत एकच झुंबड उडाली होती. गर्दीपाहुन व्यापारी सुखावला होता मात्र आज खरेदीचा दिवस असल्याने (ता.२६) सायंकाळी शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी झुंबड उडाली असतांनाच वीज वितरण कंपनीने वीज घालवत व्यापाऱ्यांसह खरेदीला आलेल्या नागरिकांना दिवाळीचा शॉक दिल.

Image may contain: night, motorcycle and outdoor

नागरिकांची एकच पंचायत

 ऐन खरेदीच्या वेळी वीज गेल्याने नागरिकांची एकच पंचायत झाली कोणत्या दुकानात जावे, कुठे खरेदी करावी, कोणती वस्तू घ्यावी, काहीच कळत नव्हते मुख्य बाजारपेठेत अंधाराचे साम्राज्य पसरले होते नागरिकांची गर्दी असतांनाही खरेदीचा हिरमोड झाला अनके नागरिक गोंधळले होते वीज वितरण कंपनीला सण सूद समजत नाही का, सणासुदीच्या दिवशी फॉल्ट कसा होतो, अगोदरच तजवीज का केली अनेक प्रश्न नागरिकांसह व्यापाऱ्यांनी उपस्थित केले विशेषतः या खरेदीच्या वेळी अंधारात महिला लहान मुलांची मोठे हाल झाले रस्त्यावर अंधार पसरल्याने खरेदीला आलेले नागरिकांनी घरचा रस्ता धरला होता यामुळे व्यापाऱ्यांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला  मात्र सणासुदीच्या काळात वीज गायब झाली असतांनाही कोणीच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला तयार नाही 

Image may contain: one or more people and night


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mseb power cut at manmad market in festival