मालेगावचे सायकलपटू मुकुंद चिंधडे ठरले सुपर रँडोनियर

मालेगावचे सायकलपटू मुकुंद चिंधडे ठरले सुपर रँडोनियर

मालेगाव : येथील प्रसिध्द वास्तुविशारद, सायकलीस्ट मुकुंद चिंधडे यांनी शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी सायकलींग ब्रेव्हे सुरत ते अहमदाबाद व परत सुरत हे 607 किलोमीटर अंतर 38 तास 30 मिनिटात पुर्ण करुन सुपर रँडोनियर हा बहुमान मिळविला. ही सायकलींग ब्रेव्हे ऑडाक्स इंडिया सुरत रँडोनियर क्लबतर्फे शनिवार व रविवारी घेण्यात आली. या स्पर्धेसाठी सुरत ते अहमदाबाद व अहमदाबाद परत सुरत असा ब्रेव्हेचा मार्ग होता. ब्रेव्हेसाठी आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे 40 तासाचा अवधी निर्धारीत करण्यात आला होता.

देशातील 40 सायकलीस्टनी यात सहभाग घेतला. शनिवारी सकाळी दहाला प्रत्यक्ष ब्रेव्हेला सुरुवात झाली. रविवारी रात्री दहाला ब्रेव्हे संपली. सुपर रँडोनियर हा किताब जो सायकलीस्ट एका कॅलंडर वर्षात 200, 300, 400 व 600 किलोमीटर सायलींग ब्रेव्हे पुर्ण करतो त्याला देण्यात येतो. गेल्या वर्षी हा मान येथील डॉ. दत्तात्रेय पाटील यांना मिळाला होता. मुकुंद चिंधडे हा मान मिळविणारे येथील दुसरे सायलिस्ट ठरले आहेत. या ब्रेव्हेसाठी त्यांना अविनाश पवार, अतुल पगार, सुदाम रौंदळ व अनिल कदम यांनी मदत केली. येथील फिजीओथेरपीस्ट डॉ. अक्षय मेहता व डॉ. देविका चिंधडे यांनी शारीरिक फिटनेससाठी चिंधडे यांना महत्वाच्या टिप्स दिल्या.

शहरात आरोग्य, व्यायामाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, याबरोबरच प्रत्येकाने आपापले आरोग्य जोपासण्यासाठी वेळ द्यावा हा यामागील हेतू आहे. शहरात व्यायामाबाबत जनजागृती होत असून विविध प्रकारचे व्यायाम केले जात आहेत. सायकलींग हा सर्वोत्कृष्ट व्यायामाचा प्रकार आहे. या ब्रेव्हे स्पर्धेत सायकलींग स्वमदतीने पुर्ण करावयाची असते. सायकलमधील तांत्रिक अडचणी सायक्लिस्टलाच सोडवाव्या लागतात.
-मुकुंद चिंधडेसुपर रँडोनियर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com