मुंबईत कृत्रिम वाघाचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

जळगाव - मुंबईत नुकतीच ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ रॅली काढण्यात आली. यात जळगावचा वाघ आकर्षणाचा विषय ठरला. जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने या रॅलीत सहभाग नोंदविला.

जळगाव - मुंबईत नुकतीच ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ रॅली काढण्यात आली. यात जळगावचा वाघ आकर्षणाचा विषय ठरला. जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने या रॅलीत सहभाग नोंदविला.

हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर येथे रॅलीचे उद्‌घाटन करण्यात आले. रॅलीची सुरवात बांद्रा येथील हिरे कॉलेजमधून झाली. भाऊचा धक्का, रेवसा मार्गे मुरुडपर्यंत पहिल्या दिवशी जनजागृती करण्यात आली. मुरुडबीच ते राजपुरीपर्यंत समुद्रीमार्गे येऊन तेथून हरी हरेश्‍वर, दिवे आगार, दापोली, गुहागर येथे जनजागृती करण्यात आली. नंतर दापोली ते गुहागरपर्यंत जनजागृती करीत गुहागरबीच येथे माजी आमदार विनय नातू यांच्या उपस्थितीत समारोप झाला, असे टायगर कॉन्झर्वेशन रिसर्च सेंटरचे (मुंबई) संस्थापक प्रसाद हिरे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी भीमराव सोनवणे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, अमन गुजर, सतीश कांबळे, बबलू शिंदे, रितेश सपकाळे, प्रथमेश सैंदाणे, यश सोनवणे, अलेक्‍स प्रेसडी, जयेश पाटील, भीमराव पारधी, वासुदेव वाढे, कृष्णा पाटील, हमीद शेख, किशोर सोनवणे, नीलेश पाटील, योगेश सोनवणे, अनिल चौधरी, राहुल पाटील, दीपक पाटील सहभागी झाले होते.

वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे ६ फुटांचा कृत्रिम वाघ गाडीवर सजविण्यात आला होता. प्रत्येक गावात त्याचे कुतूहल होते. संस्थेचे अलेक्‍स प्रेसडी, हमीद शेख, कृष्णा पाटील वाघाच्या पोशाखात संपूर्ण रॅलीदरम्यान जनजागृती करीत आहेत. टीसीआरसी  संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी शेतकरी भीमराव रतन पारधी यांना ‘वन्यजीव पालक’ हा पुरस्कार देण्यात येऊन सुवर्णपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी वृक्षारोपणासोबतच वन्यजीव संवर्धनासाठी पुढाकार घेऊन वन्यजीव संरक्षण संस्थेचे मार्गदर्शन घेत एरंडोल, भुसावळ, तालुक्‍यात स्वखर्चाने कृत्रिम पाणवठे उभारून २४ तास पाण्याची व्यवस्था केली आहे. तेथे शेकडो वन्यजीव आपली तहान भागवतात.

सेव्ह टायगर ऑफ सह्याद्रीच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रसाद हिरे यांनी भीमराव पारधी यांच्या नावाची घोषणा केली. भीमराव पारधी या जनजागृती मोहिमेत विशेष निमंत्रित होते.

Web Title: Mumbai Attractions artificial tiger