राज्यपालांच्या हस्ते मुंबईमध्ये नाशिकचा सन्मान 

Live Photo
Live Photo

नाशिक ः पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 2016-17 ते 2018-19 मधील झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्ह्याचा सन्मान राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला. जिल्ह्याला 22 प्रमाणपत्रे मिळाली आहेत. 
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., उपायुक्त अरविंद मोरे, प्रकल्प संचालक रवींद्र परदेशी यांच्यासह कळवण, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा व इगतपुरीचे गटविकास अधिकारी, मालगव्हाण (ता. सुरगाणा) येथील सरपंच व ग्रामसेवकांनी हा सन्मान स्विकारला. आवासदिनानिमित्त झालेल्या सन्मान सोहळ्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, समाजकल्याणचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी हे उपस्थित होते. 

नाशिकची कामगिरी 
0
आधार जोडणी ः 66 हजार 618 
0 बॅंक खाते पडताळणी ः 67 हजार 484 
0 पूर्ण झालेली घरकुले ः 28 हजार 86 
0 आदिवासी विकासची पूर्ण घरकुले ः 3 हजार 170 
0 सर्व घरकुले अंमलबजावणी ः 35 हजार 158 
0 नरेगा अभिसरण ः 23 लाख 29 हजार 62 मनुष्यदिन निर्मिती 
0 कामगिरी निर्देशांक ः 92.79 टक्के (पेठ-99.58, त्र्यंबकेश्‍वर-99.21, कळवण-99.18, इगतपुरी-98.46, सुरगाणा-98.25 टक्के) 
0 विभागातील पहिल्या तीन क्रमांकातील तालुका ः कळवण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com