धर्मा पाटील यांचे पार्थिव धुळ्याला रवाना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई- जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे काल(रविवार) रात्री निधन झाले. त्यानंतर त्यांच्या मुलाने सरकारकडुन लेखी आश्वासन मिळेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले होते. सरकारकडुन लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांनी ताब्यात घेतले. 

धुळे जिल्ह्यातील 84 वर्षे वयाचे शेतकरी धर्मा पाटील यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मुंबईतील जे.जे. रुग्‍णालयात त्यांचे निधन झाले.  त्यानंतर जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचं आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली होती.

संबंधित बातम्या :

Web Title: Mumbai News Farmer Dharma Patil Attempted Suicide Maharashtra dhule